Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळी महोत्सवाचे आयोजन

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुका मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजा मोहत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याव

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
बंधार्‍यावरील लोखंडी दरवाजांची चोरी
ढोरज्यात आधारकार्ड दुरुस्ती, अपडेट शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुका मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजा मोहत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी माहिती देताना संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शाम जरे म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, श्रीगोंदा येथे 12 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 06.00 वाजता दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात येणार असून सदरील कार्यक्रमासाठी येताना प्रत्येकाने दिवा अथवा मेणबत्ती सोबत आणणे आवश्यक आहे.
राष्ट्रसंत शेख महंमद बाबा हे श्रीगोंदेकरांचे प्रेरणास्थान असून बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा सरदार मालोजीराजे भोसले यांचे गुरु आहेत. संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा तालुक्याचे वतीने श्रीगोंदा शहराचा हाच जाज्वल्य इतिहास पुढे मांडताना मंगळवार दि. 14 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता राष्ट्रसंत शेख महंमद बाबा मैदान येथे महात्मा सम्राट बळीराजा यांचा स्मृतिदिन बळीमोहत्सावाच्या स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये शहरासह तालुक्यातील शेतकरी आपल्या बैलजोडीसह उपस्थित राहणार असून उपस्थित प्रत्येक शेतकर्‍यांचा सन्मान यावेळी करण्याचा संभाजी ब्रिगेडचा मानस आहे. बळीराजा मोहत्सवानिमित्ताने बाल वकृत्व स्पर्धा महादजी शिंदे विद्यालयामध्ये दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. सदरील बाल वकृत्व स्पर्धेसाठी 1) युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, 2) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, 3) आई-बाबा मोबाईल सोडा ना! (वेड मोबाईलचे) हे विषय घेण्यात आलेले आहेत.
तसेच लहान मुलांच्या कलाकौशल्यामध्ये वाढ व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास भक्कमपणे पेलणार्‍या ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठीच दि. 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीमध्ये किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेसाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या किल्ल्याचे फोटो मो. 9763587878 या संपर्क क्रमांकावर थहरीं’ी रिि करावेत. वकृत्व आणि किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 50 रुपये भरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी, सन्मानपत्र आणि सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती,श्रीगोंदा येथे दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी बक्षीस वितरण आणि गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्याक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राउत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळूंज, शहराध्यक्ष विनोद मेहेत्रे, तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे, तालुका संघटक गोरख घोडके, शहर उपाध्यक्ष दीपक साबळे, सचिव शाहरुख खान, संघटक अजीजभाई शेख आणि परीक्षक म्हणून सचिन झगडे सर उपस्थित राहणार आहेत. वकृत्व आणि किल्ले बांधणी स्पर्धेच्या नोंदणीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष तालुकाध्यक्ष इंजि. शाम जरे यांनी यावेळी केले आहे.

COMMENTS