Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोव्यातील 82 लाखांचा मद्यसाठा जप्त

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या पार्ट्यांसाठी गोव्याहून बेकायदा पाठवण्यात आलेला मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने

सहकारी पतसंस्था फेडरेशनला सर्वतोपरी सहकार्य ः बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव नगरपालिकेत समस्यांचा पाऊस
‘तारक मेहता’ दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या पार्ट्यांसाठी गोव्याहून बेकायदा पाठवण्यात आलेला मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खेड शिवापूरजवळ पकडला. या कारवाईमध्ये 82 लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त करुन ट्रकचालकाला अटक केली. विपुल देवीलाल नट (वय 32, रा. देवीलालजी नट, रोहिणीया, बासवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. गोव्यातील मद्य स्वस्त आहे. गोव्यातील मद्य अन्य राज्यात विक्रीस मनाई करण्यात आली आहे. गोव्यातील मद्याचा साठा पुण्यात पाठवण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सापळा लावला होता. मंगळवारी पहाटे सातार्‍याहून पुण्याकडे ट्रक निघाला होता. पथकाने खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ट्रक अडवला. ट्रक चालकाकडे ट्रकमधील मालाबाबत चौकशी केली. त्याने औषधांची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यातील खोक्यात मद्याच्या बाटल्या आढळल्या. गोव्यातील मद्याची महाराष्ट्रात विक्री करता येत नाही. त्यामुळे, यासंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS