Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव सुंमत भांगे यांच्या गैरकारभाराची चौकशी करा  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाची स्थापनाच राज्यातील दुर्बल, वंचित घटकांना न्याय देण्या

देवदर्शनावरुन परततांना 7 भाविकांचा मृत्यू
सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना
भारतीय विद्यार्थी शेखरप्पा नवीनचा युक्रेनमध्ये मृत्यू
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाची स्थापनाच राज्यातील दुर्बल, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी झाली आहे. मात्र या विभागाला भ्रष्टाचाराचे आणि टक्केवारीचे ग्रहण लागल्यामुळे या विभागाची झाडाझडती घेण्याची मागणी वाढू लागली आहे. सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान सचिव सुमंत भांगे यांनी या विभागात धुमाकूळ घातला असून, त्यांच्या गैरकारभाराची भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये चौकशी करा, अशी मागणीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष सिद्धार्थ भराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामुळे सामाजिक न्याय विभागात खळबळ उडाली असून, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव म्हणून पदभार घेतल्यापासून या विभागात नवीन काही योजना राबविण्याचे सोडून केवळ शासकीय योजनातून टक्केवारी वसुलीचे एकमेव काम सुरू केले आहे. हा विभाग खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी या विभागाकडे लक्ष देण्याची गरज होती. मात्र त्यांच्याकडे असलेल्या व्यापामुळे आणि त्यांच्याकडील कार्यबाहुल्यामुळे सामाजिक न्याय विभागाकडे ते तितकेसे लक्ष देऊ शकत नाहीत. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यांनी फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमधील राऊत आणि सुर्वे त्यांचे हस्तक म्हणून सामाजिक न्याय विभागात आणले आहेत. राऊत आणि सुर्वे त्यांचे खासमखास व्यक्ती असून, त्यांच्या माध्यमातून टक्केवारी वसुलीचे काम जोमात सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत भांगे हे वरील दोन हस्तकामार्फत 10 टक्के घेतल्याशिवाय कामे मंजूर करत नाहीत. महापुरुषांच्या स्मारक योजनेत 10 टक्के निधी घेतल्याशिवाय कुठलेही कामे मंजूर होत नाहीत. फिशरीज कॉर्पोरेशनचे दोन कंत्राटी कर्मचारी रोहन राऊत व सुर्वे मंत्रालयात भांगेच्या गाडीने का येतात, राज्यभरातून येणार्‍या सामान्य नागरिकांना दोन ते तीन तास लांबच्या लांब रांगेत उभे राहून मंत्रालयीन पास काढावा लागतो. मात्र भांगेचे हस्तक राऊत, सुर्वे आणि बांगर यांना मात्र मंत्रालयात थेट आणि खुलेआम प्रवेश कसा मिळतो याची मुख्य सचिव महोदयांनी चौकशी करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच राऊत सुर्वे आणि बांगर यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासल्यास गैरकारभार आणि भ्रष्टाचाराची सगळे पुरावे समोर येतील.

गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी उद्यापासून उपोषण – सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या गैरकारभाराची, भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाने दिली असून, उद्या बुधवार 5 एप्रिलपासून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सिद्धार्थ भराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. भांगे यांची हकालपट्टी करून, त्यांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

COMMENTS