राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जुलैला ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जुलैला ?

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर होऊन दोन आठवडयांचा कालावधी उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र हा मंत्रिमंडळ दोन टप्प्यात होणार असून

हा फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी ; आशिष शेलारांच्या वक्तव्याने पुन्हा ट्विस्ट
झोमॅटोच्या कर्मचार्‍यास लुटणार्‍या टोळीवर मोक्का
लोकल च्या मोटर कोचच्या डब्याला लटकला होता तरुण,अचानक हात सटकला अन्…|

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर होऊन दोन आठवडयांचा कालावधी उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र हा मंत्रिमंडळ दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्प्याचा शपथविधी 19 जुलै रोजी होणार असल्याचे बोलले जात असून, सर्वोच्च न्यायालयाचा आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निकाल आल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील शपथविधी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. यासाठी शिंदे गट व भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्हीकडून चार ते पाच मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील व चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. गुरुवारी कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सांगितले होते. मागच्या सरकारला दीड महिना पूर्ण झाल्यानंतरही फक्त सात लोकांचाच शपथविधी झाला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली होती. बंडखोर आमदारांबाबत सुप्रीम कोर्टातून निर्णय आलेला नाही. आमदारांबाबत घाईने निर्णय देता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने 11 जुलै रोजी सांगितले होते. बंडखोर आमदारांवर काय निर्णय येणार याकडे लक्ष असल्याने अध्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टातूनही निर्णय यायला उशीर होणार असल्याने कमीत कमी मंत्र्यांचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात आहे. मंत्र्यांचा शपधविधी झाला तर तो घटनाबाहेर असेल, असे खासदार संजय राऊत म्हणाले. आज दोघांचीच मंत्रिमंडळाची बैठक झाली, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. विरोधासाठी विरोध अशा भूमिकेत सरकारचे काम सुरू आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता असताना दोघांना शपथ कशी देण्यात आली, हे विचार करण्यासारखे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

COMMENTS