पाथर्डी ःतालुक्यातील घोडशिंग तांडा येथे बिबट्याने मंगळवारी मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात एक म्हशीचे वासरू मृत पावल्याची घटना घडली असून या परिसरात

पाथर्डी ःतालुक्यातील घोडशिंग तांडा येथे बिबट्याने मंगळवारी मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात एक म्हशीचे वासरू मृत पावल्याची घटना घडली असून या परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोडशिंग तांडा येथील शेतकरी बाळू जाधव हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते तर घराच्या बाहेर असलेल्या गोठ्यात म्हैस व तिचे वासरू बांधलेल्या अवस्थेत होते.मध्यरात्री दोनच्या सुमारास म्हशीचा जोरजोर्याने ओरडण्याचा आवाज आल्याने जाधव हे उठले असता त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांना म्हशीचे वासरू बिबट्या घेऊन गेला असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे जाधव हे घोडशील तांड्या मध्ये मध्यवस्तीत राहत असून लोकवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेची माहिती वनविभागाला कळवल्या नंतर आज सकाळी वनपाल बी. यु. मंचरे, वनरक्षक के. व्ही. पालवे हे गेले व त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृत वासराला शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथील पशुवैद्यकीय दवाख्यान्यात आणले.घोडशील तांडा परिसरात पिंजरा बसवण्यात येणार असल्याची माहिती मंचर यांनी दिली असून जाधव हे अत्यंत गरीब शेतकरी असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केले आहे.
COMMENTS