Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ

कराड : कबड्डी संघांच्या खेळाडूंची ओळख घेऊन नाणेफेक करून कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करताना जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.

सूर्यकुमार यादव कडून चाहत्याला खास गिफ्ट
दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई
महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात

लिबर्टी मंडळाला खेळाविषयी सर्वतोपरी मदत केली जाईल : जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांची ग्वाही
कराड / प्रतिनिधी : गेल्या 75 वर्षांमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाने अनेक नामवंत खेळाडू निर्माण केले आहेत. तसेच सहकार पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे खेळाच्या संबंधाने कोणताही प्रस्ताव असेल तर तात्काळ निर्णय घेऊन प्रश्‍न मार्गी लावतात. राज्य शासनाच्या अनेक योजना या खेळाच्या संवर्धनासाठी आहेत. लिबर्टी मजदूर मंडळाने तसे प्रस्ताव द्यावेत. त्यांना ताबडतोब मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.
सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील, उपाध्यक्ष अरुण जाधव, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. मानसिंगराव पाटील, मुनीर बागवान, काशिनाथ चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, राजेंद्र पवार, विनायक पवार, भास्कर पाटील, बाळासाहेब मोहिते, विजय गरुड यांच्यासह लिबर्टी मजदूर मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक म्हणाले, लिबर्टी मजूर मंडळाला मॅटवरील कबड्डी खेळासाठी मॅट देण्यात आले आहे. त्याचबरोबर लिबर्टी मजदूर मंडळ खेळ व खेळूंसाठी राबवित असलेले विविध उपक्रम स्तुत्य असून यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय व राज्य शासनाच्या विविध खेळ व खेळाडूंसाठी प्रोत्साहित करण्याकरिता अनेक योजना आहेत. या योजनांच्या अनुषंगाने जी मदत हवी आहे. त्या पध्दतीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. लिबर्टी मजदूर मंडळाला सर्वतोपरी मदत केली जाईल.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, उत्तम आरोग्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर यापूर्वी मी 1985 साली विद्यालय जीवनामध्ये खेळलेलो आहे. उत्तम आरोग्य, उत्तम शरीरयष्टी, उत्तम जीवन पद्धती जगायची असेल तर खेळाशिवाय पर्याय नाहीत.
लिबर्टी मजदूर मंडळाचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. मानसिंगराव पाटील यांनी लिबर्टी मजबूत मंडळाच्या गेल्या 75 वर्षातील रोमांचकारक इतिहास मोजक्या शब्दात प्रास्ताविक भाषणात विशद केला. लिबर्टी मजदूर मंडळाचे सचिव रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS