बुलढाणा प्रतिनिधी - सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेत मालाला भाव नाही..सोयाबीन, कापूस आणि हरबरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हरबरा उत्पादक शेतकर

बुलढाणा प्रतिनिधी – सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेत मालाला भाव नाही..सोयाबीन, कापूस आणि हरबरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हरबरा उत्पादक शेतकरी आज अमरावती येथील नोंदणी खरेदी कार्यालयावर नोंदणीसाठी गेले होते..या ठिकाणी पोलिसांनी शेतकर्यां वर लाठीचार्ज केला आहे.नेमके सरकारला करायचे तरी काय..सरकारला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार आलेलं आहे.. सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आलेला आहे.. अतिशय तालिबानी पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसोबत वागत आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.. सरकारच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज करण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
COMMENTS