Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त ; एकाला अटक

अहमदनगर - अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील खरे कर्जुले गावातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ज्यामध्ये 12 ब

रोटरी क्लब शेवगाव आयोजित सूर नवा ध्यास नवा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न
शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले
‘शासन आपल्या दारी’ अन् जनता ‘एसटी विना त्रासलेली’

अहमदनगर – अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील खरे कर्जुले गावातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ज्यामध्ये 12 बॉम्ब, 25 किलो दारूगोळा आणि 25 पिस्तूल राउंडचा समावेश आहे. शस्त्रसाठ्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. अहमदनगरमध्ये भारतीय लष्कराचे के. रेंज हे रणगाड्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षणादरम्यान टाकीतून उडवलेले बॉम्ब ज्याचा स्फोट झालेला नाही, असे बॉम्ब पुन्हा एकदा जवानांकडून गोळा केले जातात. मात्र या फायर रेंजचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे. जंगल क्षेत्र असल्याने तेथे लष्कराचे लोक पोहोचू शकत नाहीत. गावातील काही लोक असे बॉम्ब गोळा करतात, बॉम्ब फोडून ते भंगारात विकतात. मात्र गावात एक जणाच्या घरात बॉम्ब आणि दारुगोळा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गावात जाऊन छापा टाकला असता 25 किलो दारू गोळा, 12 बॉम्ब, 25 पिस्तूल राउंड आढळून आले आहेत. या प्रकरणात स्फोटक साहित्य आणि शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दिनकर शेळके याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवैध पद्धतीनं शस्त्रसाठा करण्यात आला होता, यामुळे मोठी दुर्घटना देखील घडू शकली असती.

COMMENTS