Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा

नाना पटोलेंच्या महत्वाकांक्षी वक्तव्याने खळबळ

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास अजूनही दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असतांना, अनेकांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडायला लागले आ

उदय सामंत यांना जाळून ठार मारू
परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ः नाना पटोले

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास अजूनही दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असतांना, अनेकांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडायला लागले आहे. अनेक जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करून पोस्टर लावल्याचे समोर आले होते. त्यातच राज्यात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांचा धुरळा थांबत नाही तोच, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या स्पर्धेत दाखल झाले आहेत. मी मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो, अशा वक्तव्य करत नाना पटोले यांनी नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर काँग्रेस राज्यात एकमेव मोठा विरोधी पक्ष ठरत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुती देवस्थानचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, हिंदू धर्मियांसाठी महत्त्वपूर्ण असलेला श्रावण महिना सध्या सुरू आहे. त्यामुळे आम्ही कुणासारखा दिखावा करत नाही. मी काँग्रेसमध्ये काम करत असल्याने आमचा पक्ष कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाही. जे देव सर्वधर्मियांचे प्रतीक आहे, त्यांचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच जात असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. याशिवाय पटोले यांना मुख्यंमत्रीपदाबाबत पत्रकारांनी विचारले असता, मी मुख्यमंत्री व्हावे अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण व्हायला हवी, असे म्हणत नाना पटोलेंनी नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. नाना पटोले यांनी खुलताबादेतील वेरुळ, घृष्णेश्‍वर, भद्रा मारुतीचे दर्शन घेतले आहे. याशिवाय नाना पटोले यांनी जर-जरी बक्ष यांच्या दर्ग्याचे दर्शन घेत चादर चढवली. त्यामुळे त्यांनी सर्वधर्मियांना भेट दिल्याने चर्चा सुरू झाल्या आहे. राष्ट्रवादीतील फूटीवर बोलताना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात काय सुरू आहे, हे बघणे आमचे काम नाही. आम्हाला सध्या जनतेची काळजी वाटत आहे. घरातला बाप हा बापच असतो, मुलाने काहीही गडबड केली तरी त्याला काही फरक पडत नाही, असे म्हणत नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला.

COMMENTS