Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रस-ठाकरेंतील कुरघोडीचे राजकारण

लोकसभा निवडणुकी महाविकास आघाडीचा विचार केल्यास वाट्याला कमी जागा येवूनही काँगे्रसने सर्वाधिक खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे काँगे्रसचा आत्मविश

दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
कथनी आणि करणीतील फरक
चिवट झुंज आणि विश्‍वचषकाचा थरार

लोकसभा निवडणुकी महाविकास आघाडीचा विचार केल्यास वाट्याला कमी जागा येवूनही काँगे्रसने सर्वाधिक खासदार निवडून आणले आहेत. त्यामुळे काँगे्रसचा आत्मविश्‍वास नक्कीच दुणावला यात शंका नाही. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जागा वाट्याला आल्या पाहिजे अशी काँगे्रसची भूमिका असतांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या चारही जागांवर उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँगे्रसने संताप व्यक्त केला आहे. खरंतर कोकण आणि नाशिक मतदारसंघातील निवडणूक लढवण्यास काँगे्रस इच्छूक असतांना, उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार जाहीर करून एक पाऊल आपण पुढे असल्याचे ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. खरंतर ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज होता की, ठाकरे सर्वाधिक खासदार मिळवून महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा बनतील अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना किमान तीन-चार जागा मिळवतील तर खरी शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे पुढे येतील हा अंदाज चुकवत काँगे्रसने सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष फरला आहे. शिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागां लढवून त्यांनी 8 जागा निवडून आणल्या आहेत.

याउलट सर्वाधिक जागा लढवून देखील उद्धव ठाकरे सर्वाधिक जागा निवडून आणण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर सांगलीमध्ये आपल्याला काँगे्रसने मदत केली नसल्याचा सूर ठाकरे गटाने लावला असला तरी, लोकसभा निवडणुकीत आपल्याच ताकदीवर लढायचे असते, त्यासाठी तशी व्यूहरचना आखावी लागते. मात्र यंदा ठाकरे गटाला कोकणचा गड राखण्यात अपयश आलेले आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गट पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेच्या सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी वातावरणनिर्मिती करतांना दिसून येत आहे. मात्र काँगे्रसचे 13 खासदार निवडून आल्यानंतर काँगे्रस देखील आपणच मोठा भाऊ असून, आपल्याला सर्वाधिक जागा मिळवण्याचा आग्रह धरू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील सूर, पुन्हा बेसूर होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनी कायमच समन्वयाचे धोरण ठेवत, आघाडी एकसंध ठेवली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत या संवादाचा विसंवाद होवू नये, अन्यथा पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पदरी निराशा येवू शकते. वास्तविक पाहता, भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठी कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येत आहे, त्यातूनच दोन्ही पक्षांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे लोकसभा निवडणुकीत धोरणच होते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे उमेदवार निवडून येणार नाही, यासाठी संपूर्ण ताकद महायुतीने खर्ची घातली, तर याउलट काँगे्रसकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र उद्धव ठाकरेंच्या जागा कमी करण्यात भाजप देखील 9 जागांवर येवून ठेपल्याचे दिसून येत आहे. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सलग दुसर्‍या दिवशी भाजपचे कान टोचले आहे. मणिपूर संघर्ष हाताळण्यात आलेले अपयश, त्यानंतर अजित पवार गटाला सोबत घेेणे महाराष्ट्र भाजपला अपयशाच्या दिशेने घेवून जाणारे ठरल्याचे मत संघाचे आहे. त्यामुळे अशोक चव्हाण, अजित पवार या नेत्यांना आपल्या पक्षात घेवून त्यांना रसद पुरवणे, आणि आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी न देणे भाजपच्या विरोधात जातांना दिसून येत आहे. असेच वातावरण आणि सूर राहिल्यास भाजपमधील अनेक नेते महाविकास आघाडीमध्ये परतू शकतात, अशीच भीती भाजपसह संघाला वाटत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काढायची असल्यास भाजपला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे, त्याचप्रमाणे, काँगे्रस आणि ठाकरे गटाला देखील जुळवून घ्यावे लागणार आहे. अन्यथा असाच विसंवाद राहिल्यास विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे एकला चलोरे चा सूर आळवला जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, तूर्तास इतकेच.

COMMENTS