कोलकाता महापालिका तृणमूल काँगे्रसच्या ताब्यात

Homeताज्या बातम्यादेश

कोलकाता महापालिका तृणमूल काँगे्रसच्या ताब्यात

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक अशा कोलकाता महानगरपालिकेच्या 144 जागांचे निकाल हाती आले असून, यात त

एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड.
डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग सेवा
नगर अर्बनचे बनावट सोनेतारण गाजण्याची चिन्हे ; बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात


कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक अशा कोलकाता महानगरपालिकेच्या 144 जागांचे निकाल हाती आले असून, यात तृणमूल काँगे्रसने 134 जागा जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर तृणमूल काँगे्रसला कडवा विरोध करणार्‍या भाजपला अवघ्या 3 जागेवर समाधान मानावे लागले आहे.
कोलकाता महापालिकेसाठी 144 जागांची मोजणी झाली. यात तृणमूलच्या खात्यात 134 जागा गेल्या आहेत. तर भाजपच्या खात्यात अवघ्या तीन आणि काँग्रेस, डाव्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन जागा गेल्या आहेत. तर तीन जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीला 71.95 टक्के मते मिळाली आहेत. तर भाजपला फक्त 08.94 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला 04.47 टक्के आणि डाव्यांना 11 टक्के टक्के मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून कोलकात्यातील मतदारांचे आभार मानले आहेत

एकूण जागा- 144
तृणमूल काँगे्रसच – 134
भाजप – 3
डावे – 2
काँग्रेस – 2
इतर – 3

COMMENTS