राज्यात 27 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 27 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम

पुणे : उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाली असतांनाच, महाराष्ट्र देखील थंडीने गारठला आहे. ही थंडी 27 डिसेंबरपर्यंत राज्यात कायम राहणार असणार असल्याचा अ

तब्बल 15 वर्षापासून फरार असणारा पकडला ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
धर्म सत्कर्माने व्यक्त व्हावा !
शिर्डीसाठी 650 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाली असतांनाच, महाराष्ट्र देखील थंडीने गारठला आहे. ही थंडी 27 डिसेंबरपर्यंत राज्यात कायम राहणार असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मंगळवारी राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे 5.5 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झालीय. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यातच आज ही निच्चांकी तापमानाची नोंद झालीय. थंडीच्या कडाक्यामुळे धुळेकर चांगलेच गारठल्याचे बघावयास मिळत आहे.
नागपूर येथे 7.8 अंश इतके सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत अतितीव्र थंडीची लाट सक्रिय झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रही गारठला आहे. राजस्थानातील चुरू आणि सिकरमध्ये सर्वांत कमी किमान तापमान (उणे 0.5 अंश सेल्सिअस) इतके नोंदविले गेले. आगामी दोन दिवसांत देशाच्या मध्य व पूर्व भागांसह महाराष्ट्राचे किमान तापमान आणखी 2 ते 4 अंशांनी घटणार आहे. हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या विशेष बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, उत्तर भारतात एकापाठोपाठ दोन पश्‍चिमी चक्रवात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तयार झाल्याने संपूर्ण देश गारठला आहे. यातील पहिला पश्‍चिमी चक्रवात 22 तर दुसरा 24 रोजी सक्रिय होत आहे, त्यामुळे हिमालयापासून ते मध्य उत्तरप्रदेश पर्यंतच्या भागात पाऊस, धुके अन् तीव्र थंडीची लाट आगामी चार ते पाच दिवस राहिल. हिमालयात बर्फवृष्टीसह पाऊस सुरू झाला आहे. एकाच वेळी दोन पश्‍चिमी चक्रवात सक्रिय झाले आहेत. संपूर्ण उत्तर भारतात पाऊस आणि जोडीला थंडीची लाट आली आहे. काही ठिकाणी किमान तापमान शून्याच्याही खाली गेले आहे.
दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा पारा आणखी घसरला आहे. पाठोपाठ राजस्थानमधील अनेक ठिकाणांवरील पारा उणे अंशावर गेला आहे. येथील चुरू या ठिकाणी तापमान उणे 0.5 अंश तापमान नोंदवले गेले. दिल्लीत सोमवारी सकाळी तापमान 3.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दिल्लीला कडाक्याच्या थंडीबरोबरच प्रदूषणाची समस्या वाढल्याने नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पहाडी भागातील बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारताच्या तापमानावर झाला आहे.

नागपूरात थंडीचे तीन बळी
विदर्भात थंडीचा कडाका सुरूच असून, नागपूरच्या तापमानात पुन्हा घट होऊन पारा 7.6 अंशांपर्यंत घसरला. दरम्यान, कडाक्याच्या थंडीने शहरात एकाच दिवशी तीन बळी घेतल्याने ही लाट आता नागपूरकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. हाडे गोठवणारी थंडी सहन न झाल्याने गणेशपेठ, कपिलनगर व सोनेगाव परिसरात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. वामन अण्णाजी सावळे, अशोक ऊर्फ दादाराव सोनटक्के उदय भुते अशी मृतांची नावे आहेत.

COMMENTS