Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शिवाजी काळेे यांचा सन्मान म्हणजे एका ज्ञानतपस्वी शिक्षकाचा गौरव  

साहित्यिक डॉ. रामकृष्ण जगताप यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर/प्रतिनिधी ःराहाता येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. शिवाजी एकनाथ काळे यांना श्रीरामपूरच्या विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा मिळालेला आ

शरद पवारांची रणनीती मोदी सरकारला शह देणार का ? l Lok News24
पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज l पहा LokNews24
समाज कल्याण व पंचायत समितीच्या वतीने लाभार्थ्यांना अनुदान वाटप

श्रीरामपूर/प्रतिनिधी ःराहाता येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. शिवाजी एकनाथ काळे यांना श्रीरामपूरच्या विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजे एका निरपेक्ष शैक्षणिक, सामाजिक, वाड्.मयीन कार्यकर्तृत्वाचा, ज्ञानतपस्वी, ज्ञानाश्रीचा सन्मान होय असे मत संमोहनतज्ज्ञ,’पोरका बाबू’कार  साहित्यिक डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप यांनी व्यक्त केले.
  श्रीरामपूर येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे शिक्षकदिनानिमित्त गुरुपूजन, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि वाचन हेच अमृतजीवन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण जगताप बोलत होते.अध्यक्षस्थानी अ‍ॅड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून सर्व गुरुजनांचे बुके, शाली,पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार केले. सौ. उज्ज्वला बुरकुले व सुरेखा बुरकुले यांनी सर्वांचे औक्षण केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांची ओळख करून देऊन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनकार्य व शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचे महत्व सांगितले.दुसर्‍याचे कार्य समजून घेणे ही माणुसकी जपली पाहिजे, हे कार्य सुखदेव सुकळे करतात याविषयीं विवेचन केले.राहाता येथील शारदा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिवाजी काळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मोहिनी काळे समवेत सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी माजी प्राचार्य तुळशीराम शेळके,डॉ.शिवाजीराव काळे, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, प्रमुख पाहुणे डॉ. रामकृष्ण जगताप, उज्ज्वला जगताप, प्रा. शिवाजीराव बारगळ, कवयित्री संगीता फासाटे, डॉ. बाबुराव उपाध्ये या शिक्षक गुरुजनांचा सुखदेव सुकळे यांनी सर्व गुरुजन ह शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी ज्ञान तपस्वी आहेत, अशा गौरवाने सन्मान करण्यात आले. तसेच आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, आरोग्यमित्र भीमराज बागुल,बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले यांचाही सत्कार झाला. सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे डॉ. रामकृष्ण जगताप यांनी विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने प्रामाणिक प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, लोकप्रबोधक यांना पुरस्काराने सन्मानित केले, हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.पुरस्कार प्राप्त डॉ. शिवाजी काळे यांनी सांगितले आपणास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे संस्कृती आणि मानवप्रेमाचा पुरस्कार आहे,तो गुरुजनांचा आशीर्वाद आहे, रयत शिक्षण संस्थेतील अ‍ॅड, रावसाहेब शिंदे यांच्यामुळे रयतमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, त्यांनी कर्मवीराप्रमाणे निरपेक्ष रयतसेवा केली. ते आदर्श रयतसेवक होते, अशा आठवणी सांगून तेलकुडगावपासूनचा जीवनप्रवास कथन केला.सुखदेव सुकळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पुरस्कार दिल्याबद्दल डॉ.शिवाजी काळे यांनी विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या पदाधिर्यांचे आभार मानले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके यांनी सांगितले की, डॉ. शिवाजी काळे ह विज्ञान शाखेचे आहेत तरीही त्यांनी कला शाखेत उच्च पदव्या प्राप्त करून 2011 ला मुळा प्रवरा बरखास्त झाली तरी ते डगमगले नाहीत, प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला, साहित्य आणि समाजजीवनात आदर्श व्यक्तिमत्व घडविले,  ज्ञान आणि नम्रतेचा आदर्श म्हणून डॉ. काळे ह नव्या पिढीसमोर दिशादर्शक असल्याचे सांगितले.संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले यांनी नियोजन केले. संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले तर उज्ज्वला बुरकुले यांनी आभार मानले.

COMMENTS