Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

32 कोटींचा तो विषय ठेवला राखून, स्मशानभूमीचा नवा प्रस्ताव आणणार

शिवसेना संपर्क प्रमुख शिंदेंची ग्वाही

अहमदनगर/प्रतिनिधी - नगरच्या महापालिकेत 32 कोटी रुपये खर्चून दफनभूमी व स्मशानभूमीसाठी खासगी जागा खरेदीचा विषय गाजत असताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे

अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण
घोटाळेबाज पुन्हा नगर अर्बनमध्ये येण्याच्या तयारीत ?; बँक बचावच्या गांधींनी दिले खुल्या चर्चेचे आव्हान
Ahmednagar : नेहरू मार्केटला भीषण आग | Loknews24

अहमदनगर/प्रतिनिधी – नगरच्या महापालिकेत 32 कोटी रुपये खर्चून दफनभूमी व स्मशानभूमीसाठी खासगी जागा खरेदीचा विषय गाजत असताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे यांनी सोमवारी या विषयावर भाष्य केले. 32 कोटीत खासगी जमीन खरेेदीचा ठराव मनपा महासभेने मंजूर केला असला तरी महापौरांनी तो विषय राखून ठेवला आहे व स्मशानभूमीसाठी शिवसेना नवा प्रस्ताव आणणार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

शिवसेना नगर शहर व जिल्हा संघटनात्मक आढाव्यासाठी आ. शिंदे सोमवारी नगरला आले होेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनपामधील 32 कोटी रुपयांच्या जागा खरेदीसंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, या विषयावरून पक्षावर शिंतोडे उडू नयेत यासाठी व मनपाचेही आर्थिक नुकसान होऊ न देता, नागरिकांना स्मशानभूमी सुविधा उपलब्ध करण्यासाठी अन्य पर्यायांचा मार्ग स्वीकारला जाईल. या ठरावाला सर्वपक्षीयांची संमती मिळाली होती. एकट्या शिवसेनेचा यामध्ये दोष नाही. पण, महापौरांनी हा ठराव आता राखून ठेवला आहे. उपनगरात स्मशानभूमीची गरज आहे व ज्या जागेवर त्याचे आरक्षण आहे, तो जागा मालक न्यायालयात गेला आहे. अशावेळी नागरिकांना सुविधाही गरजेच्या आहेत, असे स्पष्ट करून ते म्हणाले, पण महासभेत सर्वपक्षीयांनी मंजूर केलेला तो जागा खरेदीचा ठराव आता महापौरांनी राखून ठेवला आहे व लवकरच याबाबत नवा प्रस्ताव आणला जाणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पक्षाचा महापौर असूनही मनपामध्ये राष्ट्रवादीचे आमदारच कारभार करतात व महाविकास आघाडीमुळे पक्षावर मर्यादा पडतात, या पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले की, ही बाब पक्ष नेतृत्वाच्या नजरेस आणून दिली जाईल व त्यांच्या कानावर हा प्रकार घातला जाईल. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीमुळे काही मतभेद असू शकतात व चर्चेने हा प्रश्‍न सोडवला जाऊ शकतो. राष्ट्रवादीच्या आमदारांशीही याबाबत चर्चा केली जाईल. निर्माण होणारे गैरसमज पक्ष नेतृत्व व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिले जातील, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, अन्यही काही राज्यस्तरीय व पक्षाला अडचणीचे ठरत असलेले विषय येथे मांडले गेले आहेत. त्यावर येथे भाष्य करणार नाही, पण पक्षाच्या वरिष्ठांना त्याची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पक्षात नव्याने आलेल्या सुषमा अंधारे व त्यांचे वक्तव्ये यावर नगरमधील काही महिलांनी आक्षेप घेतल्याचे व त्यामुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे आ. शिंदे यांना सांगण्यात आल्याचे समजते.

गुणवत्ता सिद्धतेची संधी – आढावा बैठकीत पक्षातील पदाधिकारी बदलाची मागणी झाली नसली तरी सक्रिय व निष्क्रिय पदाधिकार्‍यांचे मूल्यमापन आता करावे लागणार आहे. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी सर्वांना दिली जात आहे. गुणवत्ता असणार्‍या शिवसैनिकांची पदावर नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे संधी दिल्यावर कोण गुणवत्ता दाखवते, हे पाहिले जाईल, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS