Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कर्नाटकच्या बसेसना फासले काळे

पुणे प्रतिनिधी - बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करत, ट्रकवर उभे राहून झेंडे मिरवणार्‍या कानडी संघटनांच्या विरोधात तीव्र पडसाद पुण्या

कार स्फोटात एका जोडप्याचा होरपळून मृत्यू | LOKNews24
सात्विक आहार हाच आपल्या सुदृढ शरीराचे औषध ः डॉ.शशिकांत काळे
सातारा जिल्ह्यातील वेदांत नांगरे बनला अल्ट्रा सायकलिस्ट

पुणे प्रतिनिधी – बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करत, ट्रकवर उभे राहून झेंडे मिरवणार्‍या कानडी संघटनांच्या विरोधात तीव्र पडसाद पुण्यात उमटले. पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसना काळे फासले आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. बेळगावात मंगळवारी सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. बर्‍याच वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता. बेळगावातील या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुण्यात कर्नाटकच्या चार बसेसना काळे फासले आहे. स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या बसना कार्यकर्त्यांनी काळे फासून बेळगावच्या घटनेचा निषेध नोंदवला.

COMMENTS