Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंजीत अखंड हरीनाम सप्ताहाची जल्लोषात सांगता

हनुमान व शनी मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळा

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील पवनपुत्र श्री हनुमान व श्री शैनेश्‍वर महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित अखंड

कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत
कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरांना ठोकल्या बेडया
Sangamner : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फी माफ करून दिलासा द्या (Video)

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील पवनपुत्र श्री हनुमान व श्री शैनेश्‍वर महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवार दि 21 मे रोजी श्री क्षेत्र सरला बेट येथील गोदाधामचे मठाधिपती प.पु रामगिरीजी महाराजांच्या सुश्राव्य कीर्तनाने व उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करत संपन्न झाली.
करंजी गावातील गावकर्‍यांनी सर्वांच्या सहकार्याने मागील वर्षी पंचक्रोशीतील भव्य दिव्य असे हनुमान व शनी मंदिर उभारलेले असून या मंदिराचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवार 14 मे ते रविवार दि 21 मे 2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कालावधीत मंदिरात  नित्यनियमाने पहाटे 4 ते 6 काकडा व भजन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8 ते 10 या वेळेत ह.भ.प सुभाष महाराज भिंगारे, ह.भ.प जालिंदर महाराज शिंदे, ह.भ.प सुभाष महाराज जगताप, ह.भ.प राधिकाताई फापाळे, ह.भ.प विजय महाराज पवार, ह.भ.प संगीताताई चव्हाण व ह.भ.प योगेश महाराज करंजीकर या कीर्तनकार महाराजांनी प्रत्येक दिवशी एक असे सातही दिवस भाविकांना आपल्या सुश्राव्य वाणीतून मंत्रमुग्ध केले. सात दिवस सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहास संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मताधिपती प.पु रमेशगिरीजी महाराजांनी भेट देत शुभ आशीर्वाद दिले, तर अखेरच्या दिवशी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देखील उपस्थित राहून रामगिरीजी महाराजांच्या कीर्तनाचा लाभ घेतला. सात दिवस सुरू असलेला हा सोहळा यशस्वीतेसाठी करंजी गावच्या समस्त भजनी मंडळांनी ग्रामस्थांनी व युवकांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS