Sangamner : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फी माफ करून दिलासा द्या (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फी माफ करून दिलासा द्या (Video)

मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फी माफ करून दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली. तालुक्यातील भाजप, काँग्रेस

धारवाडीतील प्रतीक्षा कुलाळचे स्कॉलरशिप परीक्षेत यश  
कोकणवासियांसाठी धावणार ’मोदी’ एक्सप्रेस l DAINIK LOKMNTHAN
एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाला प्रारंभ

मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फी माफ करून दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली. तालुक्यातील भाजप, काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या संस्थामध्ये जावून कार्यकर्त्यांनी या मागण्यांचे निवेदन दिले.

आरक्षणाअभावी दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचा तसेच काही सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने करायला हवा होता. परंतू सरकारने कोणताच निर्णय न केल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी पालकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

भाजयुमोचे शहर अध्यक्ष दिपेश ताटकर, तालुका अध्यक्ष शैलेश फटांगरे, सरचिटणीस संतोष गायकवाड, शशांक नामन, स्वप्निल लोंढे, प्रकाश दिघे, पोपट घुले आदी यावेळी उपस्थित होते. परंतू शिक्षण क्षेत्राकडे सरकरचे गांभीर्यने लक्ष नसल्याने मोठी उदासीनता निर्माण झाली. केवळ तुटपुंज्या फी माफीची सवलत देवून राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप भाजयुमोने आपल्या निवेदनात केला.

COMMENTS