कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहणारी बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिने याप

बिहारमध्ये ओबीसी ‘सब पे भारी!’
बर्‍हाटेसह पाच जणांविरुद्ध जमीन बळकावण्याचा आणखी एक गुन्हा
दिल्ली स्फोटात 8 जणांचा मृत्यू

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहणारी बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, धमकी देणार्‍याविरोधात फिर्याद नोंदवली आहे. कंगनाने पोलिसांना सांगितले की, तिला सोशल मीडियावरून एक व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर कंगनाने मनाली पोलीस स्टेशन गाठून तिथे धमकी देणार्‍याविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, कंगना रणौतने मनाली पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारपत्र दिले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, सोशल मीडियावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी कलम 295 ए, 504, 505,506,509 आयपीसी अंतर्गत प्रकरण प्रविष्ट केले आहे.

COMMENTS