बर्‍हाटेसह पाच जणांविरुद्ध  जमीन बळकावण्याचा आणखी एक गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बर्‍हाटेसह पाच जणांविरुद्ध जमीन बळकावण्याचा आणखी एक गुन्हा

बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे धनकवडी येथील एकता संस्थेची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खांद्यावर नेला लेकीचा मृतदेह
आमदार राजू कोरमोरे यांना धमकी
कोल्हापुरमध्ये धक्कादायक घटना; रिक्षाचालकाने महिलेला फरफटत नेलं

पुणे/प्रतिनिधी: बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे धनकवडी येथील एकता संस्थेची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बर्‍हाटे याच्याविरुद्ध फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून त्याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

 त्याची मालमत्ताही शासनाने जप्त केली आहे. युवराज सुरेश कोतवाल (रा. लक्ष्मी रोड), विजय मांगिलाल नागोरी (वय 55, रा. शंकरशेठ रोड), सुबोध त्रिलोकचंद ओसवाल (वय 44, रा. गुलटेकडी) आणि मॅक ड्रॉप इंडिया ल़ि (शनिवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी फिर्याद दिली आहे. धनकवडी येथील सर्व्हे क्रमांक दहा येथील एक हेक्टर एक आर ही जमीन संस्थेच्या नावावर असून उच्च न्यायालयानेही साठे अध्यक्ष असल्याचा निकाल दिला आहे. असे असताना एकता सहकारी गृहरचना संस्थेचे शिक्के, लेटरहेड व प्रोसिडिंग बुक यासारखे बनावट दस्तावेज तयार करण्यात आले. संस्थेची सभा झाल्याचे भासवून इतिवृत्तात तशा नोंदी करण्यात आल्या. सर्व दस्तावेज धनकवडीच्या तलाठ्याला सादर करण्यात आला. बर्‍हाटे हा संस्थेचा सचिव व सुधाकर खवले हा अध्यक्ष असल्याचे तलाठ्याला भासवले. त्याद्वारे 7/12 उतार्‍यावर स्वत:ची नावे लावून संस्थेची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. सुबोध ओसवाल आणि मॅक ड्रॉप हे संस्थेचे सभासद नसताना संस्थेचे बनावट लेटरहेड व शिक्का बनवून घेऊन त्याचा गैरवापर केला. विजय नागोरी व सुबोध ओसवाल हे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून संस्थेची व सभासदांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS