Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र रणशूर यांचे उपनगराध्यक्षपद धोक्यात

 कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी पार पडलेल्या  नगरपरिषदेच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्राच्या मदतीने पद मि

साई शक्ती स्कुलमध्ये विविध कार्यक्रम 
माजी विद्यार्थ्यांकडून कुंभारी शाळेस विशेष भेट
कोपरगावमधील शेतकऱ्यांच्या खात्यात ८० लाख जमा : रोहोम

 कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी पार पडलेल्या  नगरपरिषदेच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्राच्या मदतीने पद मिळविले असून त्यांचे पद रद्द व्हावे याबाबत अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील दाखल केले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सागर आहेर यांच्या वतीने गौतम बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ऍड.मुन्ना सय्यद यांनी दिली. त्यामुळे कोपरगाव शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे पद धोक्यात आले आहे.

ऍड.मुन्ना सय्यद यांनी सांगितले की, पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ हा प्रभाग एस.सी.प्रवर्गासाठी राखीव होता. त्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवणारा उमेदवार हा एस.सी. प्रवर्गातील असणे आवश्यक होते. परंतु या प्रभागातून आपले नाम निर्देशनपत्र भरताना विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी आपल्या नाम निर्देशनपत्रात आपल्या जातीचा केलेला उल्लेखच चुकीचा आहे.

वडिलांची जात मुलाच्या दाखल्यावर असते त्यामुळे वडिलांची जात वेगळी आणि मुलाची जात वेगळी असे असू शकत नाही. मात्र जितेंद्र रणशूर यांच्या वडिलांच्या दाखल्यावर वेगळी जात आणि जितेंद्र रणशूर यांच्या दाखल्यावर वेगळी जात असल्याचे मिळालेल्या कागदपत्रातून समोर आले आहे.  रणशूर यांनी चुकीची माहिती देवून फसवणूक केली आहे.

त्याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील दाखल केले असून लवकरच न्यायालयातही अपील दाखल करणार आहे. कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी देखील अशाच प्रकारे खोटी माहिती देवून पद मिळविले आहे. त्यांबाबत कागदपत्र उपलब्ध झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे ऍड.मुन्ना सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे जितेंद्र रणशूर यांच्या उपनगराध्यक्षपदावर टांगती तलवार या प्रकरणामुळे निर्माण झाली आहे.

COMMENTS