Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी कुटुंबीयांसाठी खावटी अनुदान मंजूर

महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 2821 आदिवासी कुटुंबीयांसाठी 1 कोटी 12 लाख 84 हजार रुपये खावटी अनुदान मंजूर झाले असून ते या आदिवासी बांधवांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार असल्याची माहिती इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली आहे.

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची नितीन गडकरी यांची घोषणा
नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुखाला मिरवणुकीत गटबाजीचा राडा l पहा LokNews24
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

संगमनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 2821 आदिवासी कुटुंबीयांसाठी 1 कोटी 12 लाख 84 हजार रुपये खावटी अनुदान मंजूर झाले असून ते या आदिवासी बांधवांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार असल्याची माहिती इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली आहे.

या अनुदानाबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की , संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबवताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी योग्य व पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यशोधन कार्यालयाच्या वतीने 18 पंचायत समिती गणांमध्ये 18 जनसेवक कार्यरत असून ते विविध गावांमधील वाडी-वस्ती गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांचे विविध दाखले, रेशन कार्ड, शासकीय योजना मिळवून देण्याचे काम  सातत्याने करत आहेत.

रायात कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉग डाऊन  मुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसमोर बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. यामुळे महा विकास आघाडी सरकारने खावटी अनुदान योजना 2020 मध्ये सुरू केली .त्यातून 2020-21 करिता ही अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या खावटी अनुदान अंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना प्रति कुटुंब चार हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ होणार आहे. यामध्ये दोन हजार रुपये रोख स्वरूपात आदिवासी बांधवाच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. तर दोन हजार रुपयांचा खाद्य वस्तूंच्या स्वरूपात लाभ देण्यात येणार आहे.  जवळपास तालुक्यातील 2821 लाभार्थींना एक कोटी 12 लाख 84 हजार रुपये अनुदान मंजूर केले असून ते लवकरच या लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. या अनुदानामुळे गोरगरीब व आदिवासी बांधवांना कोरोना संकटात व लॉग डाऊन काळातही मोठी मदत मिळणार आहे .आदिवासी व गोरगरीबांच्या विकास हाच ध्यास घेऊन सातत्याने त्यांच्या विकासाकरता महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्यावतीने इंद्रजीत भाऊ थोरात व आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत आहे. अनुदान मिळवून देण्यासाठी यशोधन कार्यालयासह आदिवासी विभागाचे संतोष तुपे, राठोड यांनीही सहकार्य केले आहे. या खावटी अनुदानामुळे आदिवासीं बांधवांच्या कुटुंबियांच्या  चेहर्‍यावर  लॉक डाऊन संकटात महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आनंद निर्माण झाला आहे..

COMMENTS