Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीत जयंतरावांचा गट फुटणार : आ.गोपीचंद पडळकर

सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्य

राघव चढ्ढा यांचे बंड; आप मध्ये फूट; आपचे राज्यसभा 7 खासदार भाजपमध्ये विलीन
सत्तेच्या मोहापायी तत्त्वांचा बळी !
ऑपरेशन लोटस की केजरीवालांची मनमानी?

सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या पक्षाचा आणखी एक गट फुटणार आहे, असा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला आहे. ‘दिवा विझताना मोठा होतो, तशीच जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
   पडळकर म्हणाले, महानगरपालिकेत शरद पवार राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. त्यातील गटनेत्यासह दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जयंत पाटील यांच्या हाताखालचे सगळेच फुटतील. आता विधान परिषदेची निवडणूक किती नगरसेवक फुटतात हा फक्त आकडा तुम्ही पहा.
     जयंत पाटील यांच्या गटातील अनेक आमदार आणि नगरसेवक त्यांची साथ सोडतील. ‘ते कितीही प्रयत्न करत असले तरी त्यांचा गट टिकणार नाही. अनेक जण वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत,’ असा दावा त्यांनी केला.
 पडळकर म्हणाले, समुद्रातून पाइपलाइनच्या वक्तव्यावर मला प्रचंड ट्रोल करण्यात आले. मिडल ईस्ट इंडिया प्रोजेक्ट हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. याबाबत सगळीकडे बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. समुद्रातून पाइपलाइन आणण्याच्या वक्तव्यावरून मला ट्रोल केले जाते. याच्यामागे जयंत पाटील यांचेच डोके आहे. सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून मला ट्रोलिंग करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान,संजय राऊत यांना टीका करण्याशिवाय काय काम आहे का? त्यांना फक्त अग्रलेख लिहिता येतो. त्यांच्या अग्रलेखांमध्ये महाराष्ट्राचा विकास, उपक्रम याबाबत कधी लिहिलेलं पाहिलं आहे का? टीका करणे हाच त्यांचा उद्योग आहे, असे आमदार पडळकर म्हणाले.

COMMENTS