Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हास्तरीय कुष्ठरोग निबंध स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील स्वप्नाली चव्हाण हिला प्रथम तर राहुल गडेराव याला द्वितीय पारितोषिक

लातूर पतिनिधी - महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय क्षयरोग शिक्षण कार्यक्रम अंतर्गत लातूर जिल्ह्यात कुष्ठरोगाबाबत नागरिक

पतीने केली पत्नीची हत्या
अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण काढताना राडा
सण-उत्सव पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

लातूर पतिनिधी – महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय क्षयरोग शिक्षण कार्यक्रम अंतर्गत लातूर जिल्ह्यात कुष्ठरोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक-विद्यार्थी यांना कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय, तांत्रिक व वैद्यकीय माहिती मिळावी याकरिता शालेय, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय यांच्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांच्या आयोजन करण्यात आले होते यामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील कु.स्वप्नाली चव्हाण हिला प्रथम तर राहुल गडेराव याला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.
त्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचा पालकासह महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने आणि उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार सोनी, नांदेड येथील जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालयातील डॉ.विद्याधर रेड्डी, समाजकार्य विभागातील डॉ.संजय गवई, वडील मोतीराम चव्हाण, आई रूक्मिनी चव्हाण, पालक दिलीप देशमुख, भागवत उत्केकर, बालिका उत्केकर, संतोष एंचेवाड, नंदू काजापुरे, रोहीत स्वामी, सौरभ देशमुख, विठ्ठल उत्केकर, योगेश्वर मुळे आणि विद्यार्थी उपस्थित होते. याचवेळी जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालय, नांदेड येथील डॉ.विद्याधर रेड्डी यांना पी.एच.डी. मिळाल्याबद्दल तसेच मोतीराम चव्हाण, आई, दिलीप देशमुख, भागवत उत्केकर, बालिका उत्केकर, रोहीत स्वामी, सौरभ देशमुख, विठ्ठल उत्केकर यांचाही सत्कार करण्यात आला.   त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे, सचिव मन्मथप्पा लोखंडे आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ, समाजकार्य विभागातील प्रा.काशिनाथ पवार, प्रा.आशीष स्वामी, प्रा.दत्ता करंडे, प्रा.नागेश जाधव, प्रा.मारोती माळी, डॉ.अशोक सारडा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी एस.एस.फले, कुष्ठरोग तज्ञ आर.पी.केंद्रे, डॉ.व्ही.जी.गुरुडे डॉ..जी.पतंगे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS