Homeताज्या बातम्याविदेश

जपानचं मून मिशन ‘स्नायपर’ चंद्रावर उतरलं

जपानचं मून मिशन स्नायपर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी उतरलंय. जपानची स्पेस एजन्सी JAXA नुसार, स्नायपर रात्री 9 वाजता चंद्रावर यशस्वी लँड झालंय. भ

नऊ वर्षानंतर इस्रो मंगळयान-2 च्या तयारीत
इस्रो पुढील महिन्यात घेणार सूर्याकडे झेप
मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटल उभारणीचा पंचनामा

जपानचं मून मिशन स्नायपर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी उतरलंय. जपानची स्पेस एजन्सी JAXA नुसार, स्नायपर रात्री 9 वाजता चंद्रावर यशस्वी लँड झालंय. भारताच्या चांद्रयान-३ या चंद्र मोहिमेनंतर जगाच्या नजरा जपानच्या स्नायपर या चंद्र मोहिमेकडं लागल्या होत्या. या यानाचं लँडिंग प्रक्रिया 20 मिनिटे अगोदर सुरू झाली होती.

या चांद्रमोहिमेअंतर्गत जपानने त्यांचं अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं आहे. याद्वारे जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या आधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत. स्लिम म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन या यशस्वी मोहिमेनंतर जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA चं जगभरात कौतुक होत आहे. गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी जपानी अंतराळ संशोधन केंद्राचं हे अवकाशयान चंद्राच्या दिशेनं झेपावलं होतं. चार महिन्यांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. २५ डिसेंबर रोजी या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. या यानाची लांबी २.४ मीटर आणि रुंदी २.७ मीटर इतकी आहे. या यानाच्या लँडरचं वजन २०० किलो इतकं आहे. यामध्ये रडार, लेजर रेंज फाइंडर आणि व्हिजन बेस्ड नेव्हिगेशन सिस्टिम आहे.

या अवकाशयानावरील कॅमेरे चंद्राच्या पृष्ठभागाचे, तिथल्या दगड-मातीचे स्पष्ट फोटो क्लिक करतील आणि ते JAXA ला पाठवले जातील. तसेच यामध्ये लुनार एक्स्पोरेशन व्हेईकल आणि लुनार रोबोटदेखील आहे. यामध्ये वापरण्यात आलेलं पिन पॉइंट लँडिंग तंत्रज्ञान हे अशी अवकाशयानं इतर ग्रहांवर उतरवण्यासाठी योग्य आहें असं JAXA ने म्हटलं आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील लँडिंग केलेल्या जागेपासून १०० मीटरपर्यंतच्या परिसराचं सर्वेक्षण केलं जाईल, असंही JAXA ने सांगितलं आहे. ज्या जागेवर हे यान उतरवण्यात आलं त्या लँडिंग साईटला शिओली क्रेटर असं नाव देण्यात आलं आहे. हा चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असलेला परिसर आहे. चंद्राचा पृष्ठभाग पाहिल्यास त्यावरील एक सर्वाद गडद काळा डाग म्हणजे ही लँडिंग साईट आहे. चंद्रावर असा आणखी एक डाग (गडद अंधार असलेला प्रदेश) आहे. मेयर नेक्टारिस असं त्या साईटचं नाव आहे. या जागेला चंद्राचा समुद्रदेखील म्हटलं जातं. जपाने अंतराळ संशोधन केंद्र आता शिओली क्रेटर प्रदेशात संशोधन करणार आहे.

COMMENTS