जामखेड ः शहरासह तालुक्याला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारया भुतवडा तलावाची पाणी पातळी खाली गेली आहे. 8 दि

जामखेड ः शहरासह तालुक्याला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारया भुतवडा तलावाची पाणी पातळी खाली गेली आहे. 8 दिवसाला येणारे पाणी आचानक 10-12 दिवसाला येऊ लागले. बदलेल्या वेळा नगरपरिषदने जाहीर कराव्यात जेणेकरून नागरिकांचे पाण्यासाठी रात्रंदिवस ताटकळणे थांबेल, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सध्या विद्युत मोटारीद्वारे तलावातील पाणी टाकीत सोडले जाते. एक टाकी भरण्यास 4 ते 6 तास लागतात.नंतर सुध्द (? ) करण्याची प्रक्रिया होते. 8-10 तासानंतर टाकीतुन पाणी खाली शहराला सोडले जाते.एकावेळी भरलेल्या टाकीतुन एक प्रभागातील 2-3 गल्ल्यांना पाणी कोठे पोहचते अन् कोठे पाहचेपर्यतच वेळ संपते तर कधी टाकीतील पाणी संपते. त्यातच विजेचा लपंडाव चालू आहे. पाण्याला दाब नाही. एकूण नागरिकांची ओरड व पाणी पुरवठयाचा खेळखंडोबा कायम आहे. कोणत्या भागाला कधी पाणी येणार. वितरण कर्मचार्यांना सांगणे कठीण झाले आहे. नागरिकांचे सतत फोन चालू राहतात. कर्मचार्यांना बोलणेही खावे लागतात. मुख्याधिकारी मस्त आहेत. कर्मचार्यांना फक्त सूचना करून मोकळे होतात. कोणत्याही गंभीर परिस्थितीत मुख्याधिकारी स्पाँटवर जात नाहीत. शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव कसा आहे? काय परिस्थिती आहे हे मुख्याधिकार्यांनी कधीच पाहिले नाही. तलावातून 8 दिवसाला पाणीपुरवठा होतांना जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा होता. मात्र उन्हाळ्यातील पिकासाठी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वीजपंप बसवून पिकांसाठी पाणी उपसा केला. याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले .अनाधिकृत पाणी उपासामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. याची जाणीव असुनही मुख्याधिकारी यांनी दखल घेतली नाही. नगरपरिषदच्या या भोंगळ्या कारभाराकडे सुजाण नागरिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे. तर दोन्ही आमदारांचे शहराच्या कोणत्याच समस्येकडे लक्ष दिसत नाही. यामुळेच अधिकार्यांचे कामाकडे दुर्लक्ष होत आहे. निर्माण झालेल्या पाणी टंचाईला नागरिक पण तितकेच जबाबदार आहेत. शहरात अनेक ठिकाणी नळाला तोट्या नसल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया जाते. पाणी भरून झाले तरी मोटारी बंद करत नाहीत. पाणी शौचालयात किंवा नालीमध्ये सोडतांना दिसत आहेत. काही लोक पाणी वापराच्या बाबतीत बेजबाबदारपणा करतांना दिसून येत आहे. कोणी सांगितले तर आमचा नळ आहे आम्ही पानपट्टी भरतो असे आडमुठे उत्तर देत भांडणाला उठतात. अशा लोकांना नगरपरिषद प्रशासनाने दंड करण्याची गरज आहे.
COMMENTS