Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आबासाहेबांच्या वसतिगृहामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले

भाऊराव वीर यांचे प्रतिपादन

शेवगाव तालुका ः आबासाहेबांनी सुरू केलेल्या वसतीगृहामध्येच शिक्षण घेऊन मी आज  क्रीडा अधिकारी म्हणून आपल्यासमोर उभा आहे असे प्रतिपादन  क्रीडा अधिका

एकाच दिवशी दोन महापौर…आणि बदलला कायदा
पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे
वाघाला पकडणे सोपे , पण माकडाला पकडणे अवघड

शेवगाव तालुका ः आबासाहेबांनी सुरू केलेल्या वसतीगृहामध्येच शिक्षण घेऊन मी आज  क्रीडा अधिकारी म्हणून आपल्यासमोर उभा आहे असे प्रतिपादन  क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी एफ. डी. एल. शिक्षण संस्थेस शासनाच्या मिळालेल्या सर्वोच्च संस्था पुरस्काराच्या लोकार्पण  सोहळ्याप्रसंगी केले. आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव या ठिकाणी आज दि फ्रेंडस् ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव या संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक, न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सर्वोच्च शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या वसतिगृहाचे माजी विद्यार्थी तथा  क्रीडा अधिकारी भाऊराव वीर होते.तसेच व्यासपीठावर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य संपतराव दसपुते, संस्थेचे शैक्षणिक विभागाचे सहप्रमुख अशोक आहेर, जनशक्ती विकास आघाडीचे जगन्नाथ दादा गावडे, देवराव दारकुंडे, राजेंद्र झरेकर, पत्रकार आलिम शेख, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, हरिश्‍चंद्र मडके शिवाजी पोटभरे, संस्थेच्या वसतिगृहाच्या माजी अधिक्षिका मीरा गाढे, प्रतिभा उबाळे, मंदाकिनी पठाडे, पांडुरंग गाडेकर, विक्रम ढाकणे, दिनकर ढाकणे, भाऊसाहेब शेळके, महारुद्र झिरपे, सोपान थोरात, सुरेश शेळके, अशोक केदार, विद्यालयाचे राष्ट्रीय खेळाडू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्रा. लक्ष्मण बिटाळ बोलताना म्हणाले, की कर्मयोगी आबासाहेब काकडे व स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांनी उभारलेल्या एफ.डी. एल. संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब, दीन दुबळे, अनाथ, कष्टकरी, शेतकरी, ऊस तोडणी कामगार यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. संस्थेकडून विविध वसतिगृहे व बालगृहे चालवली जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. एफ.डी. एल. संस्थेकडून नैसर्गिक आपत्तीत भरीव असे सामाजिक कार्य केले. 1933 पासून संस्थेने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्यामुळेच शासनाचा हा सर्वोच्च पुरस्कार संस्थेला मिळाला असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिमा उकिर्डे व ज्ञानेश्‍वर गरड यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप अशोक तमनर यांनी केला.

COMMENTS