Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड : कलाकेंद्र बंद केले; जीवे मारण्याची धमकी

जामखेड : बेकायदा कलाकेंद्र बंद केल्यामुळे आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी  याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनल

सर्वोदयाच्या तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश
आयुष्याचे वास्तव चित्रण म्हणजे गझल -प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर

जामखेड : बेकायदा कलाकेंद्र बंद केल्यामुळे आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी  याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गणेश अभिमान भानवसे रा. वांगी. ता. करमाळा, हल्ली रा. गणेशनगर, नगररोड, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दि २९फेब्रुवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी बीड जिल्ह्य़ातील उदंडवडगाव येथील विनापरवाना चालत असलेल्या जगदंबा कलाकेंद्रा विरोधात दि २६ जानेवारी रोजी बीड चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी सदरचे कलाकेंद्र बंद केले आहे. यानंतर दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सायं ६. ३० वाजे सुमारास माझ्या मोबाईल नंबरवर भागिदारीत आसलेले कलाकेंद्र चालक गुलशन हिरामन अंधारे रा. जामखेड यांनी त्यांच्या मोबाईल वरुन फोन केला व म्हणाले की, तु आमचे बीड तालुक्यातील कलाकेंद्र बंद करण्याबाबत बीड येथील पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज का दिला.असे म्हणुन शिवीगाळ केली तसेच तु जामखेड मध्ये कसा रहातोस ते बघतो तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली.  याच अनुषंगाने फीर्यादी गणेश अभिमान भानवसे रा. वांगी. ता. करमाळा, हल्ली रा. गणेशनगर, नगररोड, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दि २९ फेब्रुवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुलशन हिरामन अंधारे यांचे विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत. 

COMMENTS