Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुष्याचे वास्तव चित्रण म्हणजे गझल -प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर

लातूर प्रतिनिधी - गझल म्हणजे केवळ मनोरंजन नसून त्यामध्ये आपल्या आयुष्याच्या विविध घडामोडीचे वास्तव चित्रण लेखणीद्वारे व्यक्त केले जाते त्यामुळे ग

डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले
रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण काळाची गरज
ओपन’ साठी २० तर ‘ट्रायबल’ साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा

लातूर प्रतिनिधी – गझल म्हणजे केवळ मनोरंजन नसून त्यामध्ये आपल्या आयुष्याच्या विविध घडामोडीचे वास्तव चित्रण लेखणीद्वारे व्यक्त केले जाते त्यामुळे गझल आणि मानवी जीवन यांचा सहसंबंध हा महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन परभणी येथील प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर यांनी केले.
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि विद्यार्थी परिषद 2022-23 यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन-मुक्तीसंग्राम पर्व 2023 उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूरचे सचिव मन्मथप्पा लोखंडे हे होते तर विचारमंचावर विशेष उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक अ‍ॅड.श्रीकांतप्पा उटगे, संचालक शि.वै.खानापुरे, संचालक डॉ.महेश हालगे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, प्रभारी प्राध्यापक डॉ.बाळासाहेब गोडबोले, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, विद्यार्थी परिषद सचिव गणेश चव्हाण, विद्यार्थी परिषद अध्यक्षा प्रतीक्षा चापोलीकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी शिल्पा शिरसाट, वैष्णवी राजपूत, मिताली आगलावे आदींची उपस्थिती होती.  जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  यावेळी संगीत विभागातील प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार आणि विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. तसेच गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत सुद्धा सादर करण्यात आले. पुढे बोलताना अरविंद सगर म्हणाले की, गझल म्हणजे गझलकारांचा जीव असतो ज्यामध्ये आपल्या भावना तो व्यक्त करतो. कविता आणि गझल ह्या दोघ्या बहिणी आहेट. दैनंदिन जीवनात मानसाने मानसासाठी हात दिले पाहिजे. ज्याप्रमाणे प्राणी आणि पक्षी एकमेकांना सहकार्य करतात शिस्तीचे पालन करतात त्यांचा आदर्श घेऊन आपण आपले जीवन आनंदी आणि सुखी केले पाहिजे असेही सांगून त्यांनी विविध गझल आणि कवितांचे सादरीकरण करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली.   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थी संसद परिषदेचे प्रभारी प्राध्यापक डॉ.बाळासाहेब गोडबोले म्हणाले की, मागील काही काळापासून कोविडमुळे वार्षिक स्नेहसंमेलन झाले नाही परंतु आज आपण मोठ्या हर्षउल्लासामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न करत आहोत याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी शुभेच्छापर मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.दिनेश मौने म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव असतो. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. व्यक्तिमत्व विकास होण्याचे उत्कृष्ट दालन म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे पाच शाखा चालणारे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, क्रीडा आणि समाजकार्य विभागाद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार केले जातात.  महाविद्यालयांमध्ये शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तर समाजकार्य विभागाद्वारा सामाजिक अभियंते निर्माण केले जाऊन शासनाच्या विविध उपक्रमामध्ये समाजकार्य विभागाचा सक्रिय सहभाग असतो. तसेच महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून कुस्तीपटू तयार केले जात असून त्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. युवक महोत्सवाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी विविध पारितोषिक महाविद्यालयाला मिळवून देतात ही एक अभिमानाची बाब आहे. यावेळी विद्यार्थी संसद सचिव गणेश चव्हाण यांनी यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र आणि समाजकार्य विभागाद्वारे संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमाचा संक्षिप्त आढावा घेतला. तर साक्षी घोडके हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमांमध्ये संगीत विभागातील प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.रत्नाकर बेडगे यांचा सत्कार करण्यात आला.   यावेळी मार्गदर्शन करताना संचालक अ‍ॅड.श्रीकांतप्पा उटगे म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलते. तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शन, काव्यवाचन, विविध स्पर्धा आदींचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वाची उत्कृष्ट संधी मिळते असे ते म्हणाले यावेळी अध्यक्षीय समारोप करताना मन्मथप्पा लोखंडे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला अनुसरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाची पर्वणी असते यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्यामधील कला-कौशल्याला चालना दिली पाहिजे असे सांगून त्यांनी पुढील सर्व कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा भिसे, साक्षी घोडके आणि सुरेंद्र स्वामी यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील सदस्य प्रा.डॉ.संजय गवई, प्रा.डॉ.यशवंत वळवी, प्रा.डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, प्रा.डॉ.रत्नाकर बेडगे, प्रा.डॉ.विजयकुमार सोनी, प्रा.डॉ.शिवप्रसाद डोंगरे, प्रा.डॉ.दीपक चाटे, प्रा.डॉ.जितेंद्र देशमुख, प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.काशिनाथ पवार, डॉ.आनंद शेवाळे, प्रा.रमेश तडवी, डॉ.सुजित हंडीबाग, डॉ.मनोहर चपळे, डॉ.मंतोष स्वामी, डॉ.विनायक वाघमारे, प्रा.धोंडीबा भूरे, डॉ.शीतल येरुळे, प्रा.गोविंद पवार यांच्यासह विविध समितीतील समन्वयक आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.  

COMMENTS