Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशाच्या भवितव्यासाठी प्रत्येक नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज – समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे

पाथर्डी प्रतिनिधी - देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे ही काळाची गरज आहे.विदेशामध्ये तंत्रज्ञान विकसीत असल्याने त्या माध्

अण्णांनाही नकोत पारनेरला देवरे; लंके यांनी भेटून दिला सहा पानी अहवाल
भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा धरला हात…
निवडणूक निरीक्षक अजयकुमार बिश्त शिर्डीत दाखल

पाथर्डी प्रतिनिधी – देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे ही काळाची गरज आहे.विदेशामध्ये तंत्रज्ञान विकसीत असल्याने त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास साधला जात आहे.त्या अनुषंगाने आपल्याही विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करावी यासाठी समाज कल्याण विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती प्रदान केल्या जातात या शिष्यवृत्ती बहुतांशी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.  शहरातील विवेकानंद विद्या मंदिर येथे आयोजीत ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान – गणित प्रदर्शनाचा  पारितोषिक वितरण समारंभ पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

          यावेळी व्यासपीठावर अहमदनगर जिल्हा समाज कल्याण सहाय्य  लेखा व वित्त अधिकारी राहुल गांगर्डे ,गटविकास अधिकारी डॉ . जगदीश पालवे,गटशिक्षण अधिकारी अनिल भवार, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे,मुख्याध्यापक शरद मेढे,विलास रोडी,शिक्षण विस्ताराधिकारी भांगरे, विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सुनील कटारिया,गणित तालुकाध्यक्ष राजू पवार संपत घारे, गणित विज्ञान संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी अनिल भवार यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके यांनी करून आभार राजू पवार यांनी मानले.

पाथर्डी तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:- १ ते ५ जि. प. प्राथमिक शाळा विज्ञान गट प्रथम क्रमांक सर्वेश सचिन शिंदे जि. प.शाळा करोडी(पर्यावरण पूरक रोप कुंडी),द्वितीय क्रमांक श्रीकर योगेश शिंदे जिल्हा परिषद शाळा नाथ नगर (कोड्याच्या जगात),तृतीय क्रमांक तनरीका धर्मप्रसाद जोशी जिल्हा परिषद शाळा नाथ नगर (कारंजे) 

१ ते ५ जि. प. प्राथमिक शाळा गणित गट प्रथम क्रमांक बळे निखिल अनिल जिल्हा परिषद शाळा घाटशिरस (संख्याज्ञान फुल),द्वितीय क्रमांक लटपटे कार्तिक विष्णू जिल्हा परिषद शाळा निपाणी जळगाव(भौमितिक आकार),

तृतीय क्रमांक भालके वैष्णव नितीन जिल्हा परिषद शाळा नाथनगर(हसत खेळत गणित)

१ ते ५ खाजगी प्राथमिक शाळा विज्ञान गट प्रथम क्रमांक अली अन्वर पठाण श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर पाथर्डी (फ्री एनर्जी वॉटर पंप),द्वितीय क्रमांक सिद्धेश्वर माणिक सुरवसे निवासी मूकबधिर विद्यालय पाथर्डी (वाफेची शक्ती),तृतीय क्रमांक बोरुडे पृथ्वीराज शंकर श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी (सेंसर चष्मा)

१ ते ५ खाजगी प्राथमिक शाळा गणित गट प्रथम क्रमांक डांगे सर्विल अतुल श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी (एडिशन कॅल्क्युलेटर) द्वितीय क्रमांक पटवा कलश प्रितेश श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर पाथर्डी (पार्टस ऑफ सर्कल),तृतीय क्रमांक नरवडे कृष्णाली प्रवीण श्री वृद्धेश्वर हायस्कूल तिसगाव (मल्टिप्लिकेशन)

इयत्ता सहावी ते आठवी विज्ञान गट प्रथम क्रमांक सोनवणे ओंकार श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी (बहुउपयोगी खुर्ची ),द्वितीय क्रमांक ढाकणे ओंकार रामदास श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर पाथर्डी (वायरलेस फोन ऑटोमेशन) ,

तृतीय क्रमांक पायमोडे आदित्य परसरा छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मिरी (स्मार्ट डस्टबिन)

इयत्ता सहावी ते आठवी गणित गट प्रथम क्रमांक अनाप कार्तिकी नंदू श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी(फ्रॅक्शन्स एन्ड अँगल) द्वितीय क्रमांक डोळे आर्या सतीश श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिर पाथर्डी(संख्या ओळखणे),तृतीय क्रमांक बोरुडे स्वराली अविनाश श्री वृद्धेश्वर हायस्कूल तिसगाव(टाइप्स ऑफ अँगल )

इयत्ता नववी ते बारावी विज्ञान गट प्रथम क्रमांक हराळ ईश्वरी विक्रम श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी (वृद्धाचे आधारस्तंभ छत्री),द्वितीय क्रमांक बटुळे प्रीती मल्हारी संत भगवान बाबा विद्यालय खरवंडी (व्हर्टिकल एक्सेस),तृतीय क्रमांक कराड ओम रामनाथ महात्मा गांधी विद्यालय येळी(प्लास्टिक पासून पेट्रोल)

इयत्ता नववी ते बारावी गणित गट प्रथम क्रमांक  खेडकर श्रेया रामदास श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी (अँगल वर्किंग मॉडेल),द्वितीय क्रमांक वांढेकर दिपाली माणिक श्री वृद्धेश्वर हायस्कूल तिसगाव (प्रॉपर्टीज ऑफ सर्कल),तृतीय क्रमांक लबडे समृद्धी सतीश श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर पाथर्डी(पॉलीगोन)

     प्राथमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक बडे भागिनाथ नामदेव जिल्हा परिषद शाळा सोमठाणे नलवडे (आरोग्यासाठी काठी) माध्यमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक घुले विक्रम आसराजी दामू अण्णा माध्यमिक विद्यालय भिलवडे (त्रिकोणाचे क्षेत्रफळ)प्रयोगशाळा परिचर गट प्रथम क्रमांक बोरुडे रामदास निवृत्ती श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी (बहुउद्देशीय प्रायोगिक साहित्य)

प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री विवेकानंद विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर वृंदांनी परिश्रम घेतले

COMMENTS