Homeताज्या बातम्यादेश

चीनने लडाखची जमीन बळकावली

खा. राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषद सुरू असून, या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिन

शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य राहुल गांधीच्या भेटीला l पहा LokNews24
मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा
पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर भारत नाही का ?

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषद सुरू असून, या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतली असून, दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यावर भर देण्यात येत असतांनाच काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी चीनने लडाखची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लडाखमधील एक इंचही जमीन चीनने ताब्यात घेतली नसल्याचे धडधडीत खोटे सांगत असल्याचेही ते म्हणाले.
भारतासाठी लडाख हे मोक्याचे ठिकाण आहे. चीनने लडाखमधील भारताची हजारो किलोमीटर जमीन हिसकावून घेतली आहे, असे असतानाही मोदी सरकारकडून मात्र चीनने जमीन बळकावली नाही, असे वारंवार खोटे बोलले जात आहे, असा आरोप गांधींनी केला. राहुल गांधी पुढे म्हणाले, मी लडाखच्या कानाकोपर्‍यात गेलो. लोकांशी बोललो. आणखी एक नेता आहेत, ते फक्त मन की बात करतात. मात्र मला वाटले की मी तुमचे म्हणणे ऐकावे. इथे येऊन मी लडाखमधील लोकांच्या समस्या आणि त्यांचे खरे प्रश्‍न समजून घेण्याचा प्रयत्न केला. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले, पण लडाखला दिलेले वचन पूर्ण झाले नाहीत. लडाखच्या कानाकोपर्‍यातील तरुणांशी बोलल्यास, लडाख हे बेरोजगारीचे केंद्र बनले आहे, हे लक्षात येईल. येथे फोन नेटवर्कचा प्रश्‍नही लोकांनी मांडला होता. तसेच लडाखमध्ये विमानतळ बांधले आहे, पण येथे विमाने येत नाहीत,’ असे ही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी सध्या लडाखच्या दौर्‍यावर आहेत. गांधी यांनी लडाख ते कारगिल, असा दौरा मोटरसायकलवरून केला आहे. कारगिलहून श्रीनगर येथे परतत असताना द्रास येथे ते स्थानिक लोकांशी संवाद साधतांना बोलत होते.
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेची माहिती लडाख येथे दिली. ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर, असा प्रवास केला; त्याला भारत जोडो यात्रा असे नाव दिले. भाजपा-आरएसएसकडून देशभरात जो द्वेष, तिरस्कार पसरवला जात आहे, त्याविरोधात उभे राहण्याचा यात्रेचा उद्देश होता. ‘द्वेष-तिरस्काराने भरलेल्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडत आहोत’, असा संदेश घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो. श्रीनगर आणि एकूणच काश्मीरमध्ये त्यावेळी बर्फवृष्टी होत असल्यामुळे मला लडाखला येता आले नव्हते. ही सल माझ्या मनात होती. त्यासाठीच यावेळी लडाखचा मोटरसायकलवरून दौरा काढण्यात आला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या लडाखमधील मोकळ्या जागेवर चीनने ताबा मिळवल्याच्या दाव्याला जम्मू आणि काश्मिरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही याला दुजोरा दिला आहे. राहुल गांधी यांनी सांगितलेलं सत्य असून चीनने लडाखमधील जमीन बळकावली आहे, असे त्या म्हणाल्या.

COMMENTS