इतिहास आकलनाच्या अभावातून चौंडीचा संघर्ष!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

इतिहास आकलनाच्या अभावातून चौंडीचा संघर्ष!

महाराणी अहिल्यादेवी होळकर या भारताच्या कर्तुत्वसंपन्न राज्यकर्त्या होत्या. अल्प वयातच त्यांना वैधव्य आल्यानंतर देखील त्यांनी सती जाण्याचा निर्णय न घे

‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी; १२५ कोटींचा निधी वितरित : अजित पवार
कोरोनाच्या काळातही पोलिसांचा खिसा गरमच l पहा LokNews24
इंदापूर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ | DAINIK LOKMNTHAN

महाराणी अहिल्यादेवी होळकर या भारताच्या कर्तुत्वसंपन्न राज्यकर्त्या होत्या. अल्प वयातच त्यांना वैधव्य आल्यानंतर देखील त्यांनी सती जाण्याचा निर्णय न घेता राज्य चालवण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांचे मन त्यांच्या सासऱ्यांनी वळवले होते, असे जरी म्हटले जात असले, तरी, परंपरेच्या विरोधात एका स्त्रीने उभे राहणे, हा एक धीरोदात्तपणा आहे. अहिल्यादेवींचा हा देदीप्यमान इतिहास हा संपूर्ण भारतवासीयांना चा प्रेरणादायी आहे. मात्र अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर कोणताही जात वर्ग आणि समुदाय आपला हक्क सांगू शकत नाही हे एक साधे आणि सोपे तत्त्व बऱ्याच वेळा विसरले जाते. आज अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी म्हणजे चौंडी येथे जो काही प्रकार झाला तो प्रकार म्हणजे अहिल्यादेवींना मानणारा वर्ग एका बाजूला वाढत असताना, त्यांच्यावर त्या आमच्याच समूहाच्या म्हणून हक्क सांगण्याचा प्रकार घडला, हे देखील दुर्दैवी आहे. हे खरे आहे की शरद पवार यांना अचानकच अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती ची उपरती झाली.  परंतु, याचा अर्थ असा नव्हे की शरद पवार यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा अधिकारच नाही. याउलट गोपीचंद पडळकर यांची भूमिका ही महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाला समजून घेणारी आहे. ज्या महाराणी अहिल्यादेवी यांनी आपल्या राज्यव्यवस्थेच्या काळात जो सामाजिक विचार पेरला त्याच्या सामाजिक विचारांची फलनिष्पत्ती ही कोल्हापूरचे मराठे राजघराने आणि इंदूरचे आजच्या काळातील ओबीसी राजघराने या दोन राजकारण्यांमध्ये विवाह संबंध होऊ शकला.ही गोष्ट सनातन व्यवस्थेला नाकारणारी आहे. समतेची आहे आणि समाजाला पुढे नेणारी आहे, पुरोगामी आहे. इतिहासाचे हे वास्तव विसरून पडळकर यांनी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर एकतर्फी हक्क सांगणे आणि आज पर्यंत इतिहासात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी न करणाऱ्या पवार  यांनी जयंती साजरी करणे, या दोन्ही गोष्टी मधला अन्वयार्थ समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.  खरे तर गोपीचंद पडळकर यांची जी मानसिकता आहे, ती म्हणजे धनगर समाजाला संख्याबळ असूनही राज्याची सत्ता हस्तगत करता येत नाही; किंबहुना साधा आमदारही निवडून येत नाही! ही त्यांची शोकांतिका आहे. परंतु दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असणाऱ्या या ओबीसी जाती आहेत. त्यातील माळी, धनगर आणि वंजारी या तीन जातींना माधव सेना म्हणून आरएसएस आणि भाजप यांनी आपली हक्काची मतपेढी समजलेली आहे. त्यामुळे या जातीत मुंडे कुटुंबाचा अपवाद वगळला तर वंजारी समाजालाही फारसे नेतृत्व नाही. धनगर समाजाला तर एक आमदार निवडून आणण्याइतकीही भाजप संघ शक्ती पुरवत नाही. यापूर्वी धुळ्याचे आमदार अनिल गोटे हे स्वबळावर निवडून येत होते. परंतु फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांचाही निकाल लावला गेला, आणि सभागृहातील एकमेव धनगर आमदार सभागृहाच्या बाहेर केला गेला. हा इतिहास लक्षात घेतला तर त्यांनी संघ सोडून आपली स्वतंत्र राजकीय शक्ती उभी करणे गरजेचे आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत  वंचित बहुजन आघाडी मध्ये गेले. परंतु फार अल्प काळातच ते पुन्हा भाजपाकडे परत आले. त्यामुळे संघ भाजपला आपल्या जातीचा  पूर्णपणे उपयोग करून घेऊ देणार आणि त्या जातीला सत्ता वंचित करून घेणार, यात इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. त्याऐवजी त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. त्याकाळात त्यांना असणारा विरोध आणि त्या विरोधाला न जुमानता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सामान्य लोकांचा विकास करून आणि त्यांना खऱ्या अर्थाने सुखी आणि संपन्न करण्यासाठी प्रयत्न करणं, हा जगातील कोणत्याही राज्यकर्त्याचा एक मुख्य हेतू असावा आणि तो असलाच पाहिजे. असा दृष्टिकोन ठेवून राज्य करणारे जगाच्या पातळीवर अगदी बोटावर मोजण्याइतके राज्यकर्ते असतील त्या भारताच्या अहिल्यादेवी होळकर यांचा ही समावेश होतो. त्यांनी सर्वाधिक कार्य केले ते शेतीच्या क्षेत्रामध्ये. आजही आपण आधुनिक जगात वावरत असताना शेतीविषयक धोरण ठरविण्यात आपण अपूर्ण पडत आहोत. शेतीच्या विकासाशिवाय जगातील कोणत्याही देशाचा अन्नधान्य संपन्नतेचा विकास होऊ शकत नाही, हे वास्तव असताना देखिल शेतीच्या एकूणच नियोजनासंदर्भात आजही जे दुर्लक्ष होते, तसे अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात झाले नाही! त्यांनी शेतीला सिंचन करणारा फड हा प्रकार विकसित केला शेतीचा हा प्रकार त्यांनी केवळ त्यांच्या माळवा किंवा इंदूर राज्यापुरताच विकसित केला नाही. तर त्यांच्या राज्याच्या बाहेरू महाराष्ट्रात देखील त्यांनी फड शेती हा सिंचनाचा प्रकार विकसित करून शेतीला त्याही काळात आधुनिक बनवले होते.

COMMENTS