सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पुर
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील पुरवठा विभागातील जिल्हा पुरवठा कार्यालय व 11 तालुका पुरवठा कार्यालये, 20 शासकीय धान्य गोदामांना आयएसओ 9001-2015 व आयएसओ 2800-2007 तसेच 1 हजार 323 स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ 9001-2015 मानांकनाचे कामकाज करण्यात आले आहे.
या कामकाजामध्ये निवासी लेखापरिक्षक, मुंबई, सहायक संचालक अन्न व नागरी पुरवठा कार्यालय, मुंबई, वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, मुंबई, विभागीय गोदाम निरक्षक, पुणे तसेच जिल्हा लेखापरिक्षक, सातारा यांच्याकडील एकूण 1 हजार 237 शक प्रलंबित होते. त्यापैकी 1 हजार 36 शकांची पूर्तता करण्यात करुन ते निर्गत करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील पुरवठा विभागातील 20 गोदामे व 11 तहसिल कार्यालये यांचे जिल्हा लेखा परीक्षण पूर्ण करुन घेण्यात आले आहे. प्रलंबित शकांची पूर्तता करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांची तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या. बैठकीमध्ये आयएसओ मानांकनाबाबत करावयाचे सुधारणांबाबत करावयाची कार्यवाही व त्याचे महत्व सर्वांना समजावून सांगण्यात आले.
सर्व रास्तभाव दुकान, गोदामे व कार्यालयांची स्वच्छता, रंगरंगोटी व अभिलेख अद्यावतीकरण तसेच दर फलके, साठा फलके, दुकान चालू-बंद होण्याच्या वेळा अशा फलकांचे दर्शनी भागात प्रकटीकरण करण्यात येत आहे. पुरवठा विभागांतर्गत सर्व कार्यालयामध्ये 6 गठ्ठे पध्दतीने दप्तर लावण्यात आली आहेत. सर्व प्रकारच्या आवश्यक नोंदवह्या अद्यावत करुन अभिलेखांचे वर्गीकरण व नोंदणीकरण करण्यात आले आहे.
सर्व कार्यालये, गोदामे व रास्त भाव दुकाने यांची स्वच्छता, रंगरंगोटी व आदर्श रचना करण्यात आली. कार्यालय व रास्त भाव दुकानांमध्ये सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्र, स्मोक डीटेक्टर, प्रथमोपचार पेटी इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व आवश्यक फलक लावण्यात आले आहेत. रास्तभाव दुकानदार व गोदाममधील माथाडी कामगारांना ओळखपत्र व गणवेश देण्यात आले आहेत. सर्व रास्तभाव दुकानांचे वजन माप पडताळणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यात आले आहेत. रास्तभाव दुकानदारांना व गोदामातील हमालांना आरोग्य विभागाकडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे.
सर्व 20 गोदामांच्या आवरामध्ये 500 वृक्षांचे रोपण करण्यात आले असून त्यांचे जतन व संवर्धन होत आहे. सर्व गोदामे, तहसील कार्यालये, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये पुरवठ्याचे सॉफ्ट वेअर बसविण्यात आले आहे. सर्व रास्तभाव दुकानदारांना चलन भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचबरोबर रास्तभाव दुकानदार उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोनातून सर्व रास्तभाव दुकानांमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधा चालू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याबाबत इच्छुक रास्त भाव दुकानदार यांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.
सीएससी सेंटरच्या माध्यमातून रास्तभाव दुकानदारांना पुढील प्रकारच्या सुविधा देऊ शकतात. घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे व विमान तिकीट बुकिंग, सर्व प्रकारचे बिल्स उदा. लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेती विषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, रेशन कार्डमधील दुरुस्ती अर्ज इत्यदी.
COMMENTS