Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सभेवर बहिष्कार

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदरा

मोरगिरी विकास सोसायटीत माजी मंत्र्याच्या पॅनेलकडून विद्यमान मंत्र्यांच्या पॅनेलचा धुरळा
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर पायी प्रवास
कुडाळच्या कुंभार समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे स्वागत

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्यामुळे 11 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालिकेच्या विशेष सभेत या 11 कोटींच्या विकासकामांना मंजूरी मिळणार होती. मात्र, जलसंपदा मंत्री आदेशावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक गैरहजर राहिले. राष्ट्रवादीने श्रेयासाठी शहरातील विकासकामांना खीळ घालत असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मलगुंडे म्हणाले, शिवसेनेने आणलेल्या 11 कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी नगरपालिका सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या प्रभागात ही निधी दिला असूनही जलसंपदा मंत्री यांच्या आदेशावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार घातला. ही निंदनीय बाब आहे.
नगरसेवक शकील सय्यद म्हणाले, विशेष सभेची नोटीस तीन दिवस अगोदर सर्व नगरसेवकांना दिली होती. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी 10 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षांना पत्र देणे उचित नाही. शहराच्या इतिहासात प्रथमच 11 कोटींचा निधी रस्ते कामासाठी आल्याने राष्ट्रवादीच्या पोटात गोळा उठला आहे. शिवसेनेने शहराच्या विकासासाठी 11 कोटींचा निधी आणला. जलसंपदा मंत्री यांनी ही 22 कोटींचा निधी आणावा. त्यांचा जाहीर सत्कार करू. नागरिकांना वेठीस धरण्याचे पाप राष्ट्रवादीने सातत्याने केले आहे. त्यांना विकासाचे देणे-घेणे नाही. कागदी घोडे नाचवून सत्ता मिळवायची आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा. हा एकमेव उद्योग राष्ट्रवादीचा आहे. विकास आघाडी व शिवसेनेने शहरातील नागरिकांची अपेक्षा पूर्ती केली आहे. त्याचे श्रेय घेता येणार नाही. ही पोट दुखी राष्ट्रवादी नेत्यांची आहे. आनंदराव मलगुंडे नगराध्यक्ष असताना विकास आघाडीने कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. परंतू त्याला खोडा घालून ती योजना 24 कोटीवर नेऊन ठेवण्याचे पाप राष्ट्रवादीने केले आहे. आपल्याच कोंबड्याने दिवस उगवला पाहिजे, अशी वृत्ती आता चालणार नाही. शहरातील जनता सुज्ञ आहे.
यावेळी नगरसेवक प्रदीप लोहर, राजेंद्र पवार, अंकुश माने, सतीश पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS