अहमदनगर ः अांतरराष्ट्रीय महिला दिवसाचे आयोजन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर क्लब येथे महिलांचा सन्मान करून महिला दिन उत
अहमदनगर ः अांतरराष्ट्रीय महिला दिवसाचे आयोजन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर क्लब येथे महिलांचा सन्मान करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा विषय महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला गती द्या या विषयावर वरिष्ठ अॅड. श्रीमती रईसा मदनी यांनी मार्गदर्शन केले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी रेल्वे विभागातील महिलांची कामगिरी बद्दल उजाळा दिला कर्मचार्यांचे कौतुक केले आज भारतीय रेल्वे विभागात सर्वोच्च पदाला देखील आज या घडीला महिला पदस्त आहेत असे देखील सांगितले. रोजच्या धावपळीच्या जीवनात व कार्यरत महिलांना होणारा व शारीरिक ताण हे कमी करण्यासाठी घेण्यात येणार्या उपायांवर मार्गदर्शन डॉ. रोहिणी दुलंगे यांनी केले. महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व विजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात आलेले. या कार्यक्रमात अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेंद्रसिंह परिवार वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी अरविंद कुमार भगत, महिला कल्याण संघटनेच्या सचिवा श्रीमती स्वप्ना बनसोडे, सर्व शाखा अधिकारी, अधिकारी तथा मान्यता प्राप्त युनियन, असोसिएशन चे पदाधिकारी आणि सोलापूर विभागात कार्यरत असणारे महिला कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम कर्मचारी लाभ निधी समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता व तो यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी तथा अध्यक्ष कर्मचारी लाभ निधी अरविंद कुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्मिक विभागाने सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री एस एल खोत, महिला प्रतिनिधी, मुख्य कल्याण निरीक्षक महावीर निमानी, अक्षय गर्दने, अरविंद खडाखडे, अजय सावंत, पंकज कुमार अमरजी झा, सतीश सोनवणे व कार्मिक विभागाच्या सर्व कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS