Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो- राज ठाकरे

नाशिक प्रतिनिधी - आपले विरोधक हे पत्रकारितेतही आहेत. ते सर्व गोष्टी पसवरतात. ते सुरुवात करतात. शेवट करत नाही. आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाह

महाराष्ट्र एकीकरण समितीला संधी द्या
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाच्याच्या साखरपुड्यात एकत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक

नाशिक प्रतिनिधी – आपले विरोधक हे पत्रकारितेतही आहेत. ते सर्व गोष्टी पसवरतात. ते सुरुवात करतात. शेवट करत नाही. आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही? एक आंदोलन दाखवा. त्याचा शेवट नाही केला? बाकीच्यांना प्रश्न विचारत नाही. मागच्या सरकारने एक विषय पुढे ढकलला होता. त्याचं काय झालं. अरबी समुद्रात शिवस्मारक का नाही झालं? पंतप्रधान आले फुलं वाहून गेले. त्या फुलांचं काय झालं. अनेक गोष्टी आहेत. मनसेने जेवढी आंदोलने केली त्याचा शेवट केला. टोलनाके बंद झाले. मी पहिल्यापासून सांगत होतो, आपली भूमिका स्वच्छ होती. टोल तर जगभर चालतात. आमचं म्हणणं होतं टोलमधून पैसे येतात ते कुठून येतात आणि जातात कुठे? रस्ते नीट करता येत नाही आणि टोल वसूल करताय? मराठी पाट्या झाल्या. अनेक प्रार्थना स्थळावरचे भोंगे काढायचे म्हटलं बंद झाले भोंगे बंद झाले, अशी अनेक उदाहरणे मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या आंदोलनाची दिली. नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे सरकार हे डरपोक सरकार होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आम्ही भोंग्यावर बोललो. त्यांनी १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हे म्हणे हिंदुत्ववादी. या भोंग्यांचा मुस्लिमांना त्रास होतो. काल मुस्लिम मोहल्ल्यात गेलो होतो. आंदोलन झाल्यावर भोंगे बंद झालं. पण सरकारच ढिल्लं पडलं. एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो. बघू कुणात हिंमत आहे पुन्हा भोंगा लावण्याची. माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो, असे राज ठाकरे कडाडले.

COMMENTS