Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फळबागांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करा

राजेंद्र नागवडे यांची प्रशासनाकडे मागणी

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यात व इतरत्र मोठ्या प्रमाणांत वादळी पाऊस झाला. वादळाच्या प्रभावाने शेतकर्‍यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणांत नुकस

एकमेकांच्या नगरसेविका फोडल्या…भाजप नगरसेवकांतील गटबाजी शिगेला
अरणगाव ग्रामपंचायतीला सदस्य ठोकणार टाळे
कोरोनाचा “डबल म्युटंट स्ट्रेन” लहान मुलांसाठी अति घातक | ‘सुपरफास्ट २४’ | LokNews24

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यात व इतरत्र मोठ्या प्रमाणांत वादळी पाऊस झाला. वादळाच्या प्रभावाने शेतकर्‍यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झालेले आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये फळबागांचे प्रमाण अधिक आहे. शेतकरी फळबागांवर जीवापाड प्रेम करुन त्यांचे संगोपन व संवर्धन करीत आहेत. परंतु कालच्या वादळी वार्‍यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे त्यांना शासकिय पातळीवर मदतीचा हात मिळणेकरीता नुकसानग्रस्त फळबागांची पहाणी व पंचनामे त्वरीत होणे गरजेचे आहे. त्याकरीता संबंधीत अधिकार्‍यांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी राजेंद्रदादा नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने सदैव कटीबध्द रहाणार असून तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे प्रेम हीच आपल्या जीवनाची खरी शिदोरी असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी केले. सध्या लोकसभेची निवडणुक प्रक्रिया चालू असल्यामुळे राजेंद्रदादा नागवडे यांचा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर अतिशय साध्या पध्दतीने साजरा करणेत आला. प्रथम तालुक्याचे भाग्यविधाते स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले. तदनंतर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांच्या अध्यतेखाली झालेल्या छोटेखानी सभेत नागवडे बोलत होते. यावेळी ते म्हणाले स्व. बापुंनी या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या सर्व संस्था नावलौकीकास आल्या. बापुंच्या सामाजिक व राजकिय कार्याचा वसा आणि वारस घेवून त्यांचा नावलौकीक टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल आहोत. बापू गेल्यानंतर गेल्या 5-6 वर्षात निश्‍चीतच मान उंचावेल असे काम सहकारी संचालक व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने केलेले आहे. नागवडे परिवाराने गेली 50-60 वर्षापासुन समाजाची बांधीलकी स्विकारुन सचोटीने काम केले असल्यामुळे एक विश्‍वासार्हता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनतेनेही नागवडे परिवारावर भरपूर प्रेम केले आहे. हीच माझ्या जीवनातील खरी शिदोरी असल्याचे नागवडे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, अ‍ॅङ विठ्ठलराव काकडे, कामगार नेते कॉ. आनंदराव वायकर, सतिष मखरे, प्रा. सतिषचंद्र सुर्यवंशी आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन नागवडे यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS