Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयएनएस इम्फाळ आज होणार नौदलात दाखल

मुंबई ः शत्रुला धडकी भरवणारी आणि ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस इम्फाळ युद्धनौका आज मंगळवारी भारतीय नौदलात दाखल होणार आहे. या यु

सीमावर्ती भागाचा विकास कुणामुळे रखडला ?
आंबील ओढ्यालगतची अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती
निकालापूर्वीच ठिणगी

मुंबई ः शत्रुला धडकी भरवणारी आणि ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस इम्फाळ युद्धनौका आज मंगळवारी भारतीय नौदलात दाखल होणार आहे. या युद्धनौकेमुळे हिंदी महासागरातील वाढत्या कारवायांना रोखणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे आयएनएस इम्फाळ ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर आहे. तसेच ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव देण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे.
राष्ट्रपतींनी एप्रिल 2019 मध्ये या युद्धनौकेला मंजुरी दिली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेचा सैन्यदलात समावेश करण्यात येणार आहे. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या समृद्धीसाठी ईशान्येकडील राज्यांचे महत्त्व यातून स्पष्ट होते. या जहाजाचे वजन 7,400 टन असून एकूण लांबी 164 मीटर आहे. ही युद्धनौका कजमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जहाजविध्वंसक क्षेपणास्त्रे आणि टॉरपीडोने सुसज्ज आहे. आयएनएस इम्फाळच्या बंदर आणि समुद्रात दीर्घ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच 20 ऑक्टोबर रोजी आयएनएस इम्फाळला भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर या जहाजाने गेल्या महिन्यात विस्तारित पल्ल्याच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.

COMMENTS