Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरीचा डाव

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असे म

ओबीसी आरक्षण… केंद्र सरकारच पितळ उघड… इतके दिवस महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं…
ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेना

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असे म्हणत होते की, मराठ्यांना आरक्षण देतांना इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही, परंतु जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्‍वासन आणि कुणबी मराठ्यांकरिता काढलेला जी.आर. यामुळे राज्यभर कोट्यावधी  मराठा समाजाला कुणबी असल्याचे दाखले देणार असल्यामुळे ओबीसीच्या 19 टक्के आरक्षणामध्ये उघड-उघड घुसखोरी करतील आणि बारा- बलुतेदार यांच्या हक्कावर गदा आणतील असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.
यावेळी माजी खासदार राठोड म्हणाले की, मराठा समाजाचे ओबीसीकरण करून गावकुसात राहणारे परंपरागत व्यवसाय करणार्‍या जातीवर अन्याय करतील, हे सरकारच्या लक्षात येत नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सरकारआता वेळ मारून नेईल, परंतु येणार्‍या निवडणुकीमध्ये सर्व बाहेर येईल.  निजामशाहीच्या काळात आंध्रा आणि सीपी अँड बेरार राज्याचे विभाजनापूर्वी बंजारा आणि धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये होता, आजही आंध्रा आणि तेलंगणामध्ये बंजारा आणि धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये आहे, तसेच महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाच्या कुणबी असल्याचे नोंदी सरकार शोधत असेल तर धनगर आणि बंजारा समाजाच्या नोंदी देखील शोधण्यात याव्यात, राज्याच्या एसटीच्या लिस्टमध्ये बंजारा समाज 35 क्रमांकावर आहे तर धनगर समाज 36 क्रमांकावर आहे, या दोन्ही समाजाला ’अनुसूचित जमाती’ (ब) असे वर्गीकरण करून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आरक्षण अभ्यासक माजी खासदार राठोड यांनी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये दोन आमदारांची घर जाळण्यात आली, त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला तसेच, आमदार राजेश राठोड यांच्या गाडीची तोडफोड करून, त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राज्यात भीतीचे आणि दहशतीची वातावरण निर्माण झाले आहे, ग्रामीण भागातील ओबीसी समाज भयभीत झाला असून, ओबीसीचे नेते तणावात वावरत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे सर्वसामान्य जनता असुरक्षितअसल्याचे चित्र निर्माण झाले आहे, जाळापोळ करणार्‍याआणि दहशत निर्माण करणार्‍यां वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील राठोड यांनी केली आहे.

COMMENTS