भारत-चीन संघर्ष नव्या वळणावर

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारत-चीन संघर्ष नव्या वळणावर

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गलवान खोर्‍यात चीनी ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ चीनकडून व्हायरल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पं

काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?
कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं ?
तामिळनाडू आणि राज्यपालांचा संघर्ष

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गलवान खोर्‍यात चीनी ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ चीनकडून व्हायरल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर काही दिवसांतच भारतीय जवानांनी तिथे तिरंगा फडकावत चीनला चोख प्रत्युत्तर दिले. यामुळे पुन्हा एकदा चीन डोकेवर भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. मात्र गलवान खोर्‍यातील वाद हा तसा नवीन नाही. हा वाद जुनाच आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच चीन सरकारने नवीन सीमा कायदा लागू करण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारत सरकारने सीमावर्ती राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील आणि नवी नावे दिल्याने वस्तुस्थिती बदलत नसल्याचे चोख प्रत्युत्तर दिले. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा भारत-चीन संघर्ष समोर आला आहे. मात्र गलवान खोर्‍याचे महत्व इतके का महत्वाचे त्याचा घेतलेला हा आढावा. भारताशी लागून असलेल्या सीमा भागातील परिस्थितीबद्दल चीनलाही चिंता आहे आणि त्याची दखल अत्युच्च पातळीवर घेतली जात आहे, याचेच हे निदर्शक आहे. डोकलाममध्ये भारताने चीनच्या हालचालींना घेतलेला आक्षेप हा चीनसाठी धोक्याचा इशारा होता. डोकलाम हा परिसर भूतानचा भाग आहे असे भारताचे म्हणणे आहे. या भागातील झोम्पेलरी (जम्फेरी) पर्वतरांगांमध्ये रस्ता बांधण्यास भारताने चीनला कडाडून विरोध केला होता. गलवान खोरे वादग्रस्त अक्साई चीनमध्ये आहे. गलवान खोरे लडाख आणि अक्साई चीनच्या मधोमध भारत-चीन सीमेच्या जवळ आहे. या ठिकाणी असलेली नियंत्रण रेषा अक्साई चीनला भारतापासून वेगळी करते. अक्साई चीनवर भारत आणि चीन दोघंही दावा करतात. याची सुरुवात 1958 मध्येच झाली होती. जेव्हा चीनने अक्साई चीनमध्ये रस्ता बनवला जो कराकोरम रोडला जोडला जातो आणि पाकिस्तानच्या दिशेनेही जातो. जेव्हा रस्त्याचे काम सुरू होते तेव्हा कुणाचेही लक्ष त्याकडे गेले नाही. पण जेव्हा लक्षात आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आक्षेप घेतला. तेव्हापासूनच भारताकडून हे सांगण्यात येते की अक्साई चीनला चीननेच हडपलं. तेव्हा भारताने याबाबत कोणतीही लष्करी कारवाई केली नव्हती. आता भारताला या जागेवर दावा सांगायचा असल्याने भारताकडून कारवाई करण्यात येत आहे. ज्याप्रकारे पीओके आणि गिलगीट-बालटीस्तान विषयी भारताने आपला हक्क मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.चीनच्या दक्षिण शिनजियांग आणि भारताच्या लद्दाखपर्यंत हे खोरे पसरलेले आहे. भारतासाठी ही जागा सर्वच बाजूनं महत्त्वाची आहे. कारण पाकिस्तान, चीनच्या शिनजियांग आणि लडाखच्या सीमेला लागून हा परिसर आहे. 1962 च्या युद्धातही गलवान खोरे युद्धाचे प्रमुख केंद्र होता. चीनने नवी रणनीती आखण्यास सुरूवात केल्यामुळे गलवान खोर्‍यातील संघर्षात वाढ होतांना दिसून येत आहे. चीनने डोकलाम भागात देखील पायाभूत सोयी-सुविधांचा धडाकाच लावला आहे. लष्करी सुविधा अद्ययावत करतानाच सीमाभागात नागरी वस्ती वाढवण्याची नवी रणनीती चीनने आखली आहे. सीमाभागात बर्‍यापैकी समृद्ध गावे वसवण्याची ही रणनीती आहे. सीमा भागांतील नागरिकांचे जीवनमान उंचावणे व सीमा सुरक्षा अधिक मजबूत करणे हे त्यामागील दोन प्रमुख हेतू आहेत. पुढील काही वर्षांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ अशी 600 हून अधिक गावे वसविण्याची योजना आखण्यात आली आहे. भारत-चीनमध्ये 1962 साली झालेल्या युद्धानंतर भारत-तिबेट सीमेवरील व्यापार थांबला. त्यामुळे या व्यापारावर अवलंबून असलेली सीमावर्ती गावे हळूहळू रिकामी झाली. त्यानंतरच्या काही वर्षांत हिमालयीन प्रदेशातील गावांमध्ये लोकसंख्या घटण्याचा वेग वाढला आणि ही समस्या गंभीर बनली. पर्वतीय प्रदेशात जमीन अगदी अल्प आहे आणि उपजीविका चालवणे कठीण आहे.

COMMENTS