Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंडिगोच्या 1 जूनपासून 5 शहरांसाठी विमानसेवा

नाशिक । प्रतिनिधी नाशिकहून गोवा, इंदौरसह 5 शहरांसाठी इंडिगो विमान कंपनीद्वारे विमानसेवा सुरू करण्यात येत असून, इंडिगोने या शहरांसाठीचे वेळापत्रक

चौदाशे कोटींतून होणार पायाभूत वीज विकास ; लाखावर शेतकर्‍यांनी भरले 2100 कोटी वीज बिल
विरोधकांकडून पालकमंत्री सावे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र-अजय शिंदे
नुपूर शर्मा विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करून अटक करा

नाशिक । प्रतिनिधी नाशिकहून गोवा, इंदौरसह 5 शहरांसाठी इंडिगो विमान कंपनीद्वारे विमानसेवा सुरू करण्यात येत असून, इंडिगोने या शहरांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मध्यंतरी विमानसेवेसाठी बुकिंग सुरू करण्यात आली होती. मात्र आता वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने 1 जूनपासून इंडिगोच्या पाच शहरांसाठीच्या विमानसेवा सुरू होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. इंडिगोच्या वतीने नाशिक नागपूर, नाशिक गोवा, नाशिकहून अहमदाबादसाठी दोन विमान, नाशिक- हैदराबाद व नाशिक – इंदौर या शहरांची विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून शहराला देशातील महत्त्वाच्या शहरांची विमानसेवेने जोडले जाणार आहे. इंडिगो विमान कंपनीतर्फे नागपूरला 9.40 ला उडाण घेत 11.25 वा. नाशिकला विमान पोहोचणार आहे. हेच विमान परतीचा प्रवास रात्री 7.30वा. करणार असून, रात्री 9.10 वा. नागपूरला पोहोचणार आहे. गोवासाठी नाशिकहून 11.45वा. विमान उडाण करुन ते गोव्याला दुपारी 1.25 मिनिटांनी पोहोचणार आहे गोव्यावरून तेच विमान 1.55 मिनिटाला परतीचा प्रवास सुरू करेल आणि नाशिकला 3.45 मिनिटांनी पोहोचणार आहे. अहमदाबादसाठीच्या दोन विमानांपैकी एक विमान सायंकाळी 4.05 मिनिटांनी उडाण घेऊन 5.25 मिनिटांनी अहमदाबादला पोहोचणार आहे अहमदाबादहून परतीचा प्रवास 5.56 मिनिटांनी सुरू करून 7.10 मिनिटांनी नाशिकला पोहोचणार आहे. तर नाशिक अहमदाबादसाठी दुसरे विमान सकाळी 8.00 वाजता उडाण घेऊन 9.25 मिनिटांनी नाशिकला पोहोचेल, पण नाशिकहून 9:45 उडान घेऊन अहमदाबादला 11.05 मिनिटांनी पोहोचेल.हैदराबादहून सकाळी 10.30 वाजता निघालेले विमान नाशिकला 12.30 मिनिटांनी पोहोचेल व परतीच्या प्रवासात 2.45 मिनिटांनी निघून 4.25 मिनिटांनी हैदराबादला पोहोचणार आहे. इंदौरसाठीचे विमान 12.50 मिनिटांनी नाशिकहून निघून 2.10 मिनिटांनी इंदौरला पोहोचणार आहे तर इंदौरहून नाशिकसाठी दुसरा विमान 1.15 मिनिटाला निघून 2.25 मिनिटांनी नाशिकला पोहोचणार आहे. स्पाईस जेट विमान कंपनीतर्फे दिल्लीहून नाशिकसाठी 10.50
वा. विमान उड्डाण करीत आहे. ते नाशिकला 12:30 ला पोहोचते. नाशिकहून दुपारी 1.10 वा. दिल्लीसाठी उडान करून 3.20 मिनिटांनी दिल्लीला पोहोचत आहे.

COMMENTS