Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाथजल बाटलीबंद पाण्याची वाढीव दराने विक्री

एसटी महामंडळाकडून संबंधिताचा परवाना रद्द

नाशिक । प्रतिनिधी एकीकडे शहरात उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाली असताना नाशिकककरांची तहानही वाढली आहे. त्यामुळे घरात असताना, बाहेर फिरताना पाण्याचा

नवी मुंबई पोलिसांचा दणका
ठाकरे गटाला पुन्हा धक्का
राहाता शहरात मांज्यामुळे दहा वर्षाचा मुलगा जखमी

नाशिक । प्रतिनिधी एकीकडे शहरात उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाली असताना नाशिकककरांची तहानही वाढली आहे. त्यामुळे घरात असताना, बाहेर फिरताना पाण्याचा अधिकच वापर होतो आहे. प्रवासात पाण्याच्या बाटलीचा सर्रास वापर होतो आहे. अशातच नाशिक रोड बसस्थानकावर एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नाथजल या बाटलीबंद पाण्याची विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडून प्रवाशांची लुबाडणूक होत असल्याचे समोर आले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच एसटी महामंडळाने तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना सोयीस्कर व्हावे म्हणून ‘नाथजल’ नावाने बाटलीबंद पाण्याची विक्री केली जाते. साधारण 15 रुपयांना या पाण्याच्या बाटलीची अधिकृत विक्री केली जाते. मात्र नाशिक रोड बस्थानकावर अलीकडे कूलिंग चार्जच्या नावाखाली एका बाटलीमागे पाच रुपये अतिरिक्त चार्ज आकारून नाथजलची विक्री केली जात आहे. नाथजल बाटलीबंद पाण्याची विक्री चक्क 20 रुपयांना केली जात आहे. याबाबत नाशिक रोड बसस्थानकातील संबंधित नाथजल विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात संबंधित पाणी बाटली विक्रेता महिला ग्राहकाशी संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाने त्याची दखल घेऊन तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असून, व्हिडिओत एक महिला ग्राहक पाणी बाटली विक्रेत्या महिलेशी संवाद साधताना दिसत आहे. तत्पूर्वी विक्रेत्याने संबंधित महिलेला 15 रुपयांची पाणी बाटली 20 रुपयांना दिल्याचे व्हिडिओतून निदर्शनास येत आहेत. याचाच जाब विचारण्यासाठी महिलेने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये विक्रेता महिला अरेरावीची भाषा करत असल्याचे दिसून येत आहे. एसटीच्या अधिकार्‍यांनी नाशिक रोड बसस्थानकावरील स्टॉल प्रतिनिधीचा परवाना रद्द करण्याचे व त्याच्या जागी तत्काळ प्रभावाने नवीन प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS