नवे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल !

अपेक्षेप्रमाणेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने १६४ एवढ्या मतांनी बहुमत प्राप्त केले, तर विरोधात केवळ ९९ मते पडली. काल १६४ विर

Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो
चक्क..मुख्याध्यापकाने शिक्षकाचा चावला अंगठा | LOKNews24
पंचायत समिती पदाधिकारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात

अपेक्षेप्रमाणेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने १६४ एवढ्या मतांनी बहुमत प्राप्त केले, तर विरोधात केवळ ९९ मते पडली. काल १६४ विरुद्ध १०७ अशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीतील आकडेवारी होती. तीच आकडेवारी आज १६४ विरुद्ध ९९ अशी झाली. याचाच अर्थ, एका रात्रीतून जवळपास आठ मतांचा फरक पडला. मग ही आठ मध्ये नेमकी गेली कुठे, असा प्रश्न सामान्यपणे कोणाच्याही मनात येऊ शकतो; परंतु, यावर काल ज्या तीन सदस्यांनी तटस्थता घेतलेली होती, त्यांच्यासह आणखी काही सदस्यांनी विशेषता काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात जाणीवपूर्वक येण्यास उशीर केला की, अनुपस्थित राहण्याचा प्रयत्न केला, हे स्पष्ट झाले नसले तरीही, सभागृहात काही सदस्यांनी आपली अनुपस्थिती विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी दाखवली, ही वस्तुस्थिती आहे. आजच्या विशेष अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे विचार सभागृहात मांडले. त्यांच्या आभार प्रदर्शनाच्या ठरावावर व्यक्त होताना प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महत्त्वपूर्ण अशी मते मांडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीतील वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांना आणि वेगवेगळ्या विभागांना दिलेल्या निधीची आकडेवारी सादर केली आणि त्या आकडेवारीच्या सादरीकरणातून आपण कोणत्याही पक्षाशी पक्षपात केला नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी एकच महत्वपूर्ण बाब या ठिकाणी निर्देशित केली, ते म्हणजे सभागृहाचे जे सदस्य आहोत, जे अतिशय सामान्य अवस्थेतून आपण या सभागृहात दाखल झालो, त्याचे एकमेव कारण म्हणजे या देशाची घटना. त्यामुळे, या देशाच्या घटना म्हणजेच संविधानाचा आदर, श्रद्धा आणि निष्ठा ही या सभागृहातील प्रत्येक सदस्याकडे असावी, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी एवढी मांडली. एकंदरीत दोन दिवशीय विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नव्या सरकारने विश्वास दर्शक ठराव बहुमताने पारित करून घेतला. यावेळी, त्यांच्यासमोर असणारी आव्हाने नेमकी काय आहेत, याचा लेखाजोखा सध्याच्या विरोधी पक्ष असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी मांडला; तर, यापूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊन सत्ताधारी बनलेल्या सदस्यांनी त्यांच्या हिंदुत्वाचा पाढा वाचला. एकंदरीत सभागृहात आगामी काळात नेमकी काय खडाजंगी होणार, याची एक रंगीत तालीम आजच्या अधिवेशनात अभिनंदन प्रस्तावावर बोलताना सदस्यांमध्ये दिसून आली. नव्या सरकार समोर कामकाजाच्या आवाहनांना पेलण्याची क्षमता निश्चितपणे आहे. यासाठी पाच वर्षे मुख्यमंत्री पद अनुभवलेल्या देवेंद्र फडणवीस यांची साथ सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जरूर मिळणार. त्यामुळे सरकार चालवताना अनेक आव्हाने असली तरीही, सरकार चालवण्याची एक अनुभवी प्रक्रिया सध्याच्या नेतृत्वाकडे आहे, हे आपल्याला स्पष्टपणे म्हणावे लागेल. हे सरकार गठीत झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे सरकार फक्त सहा महिने टिकेल, असे वक्तव्य जे केले आहे, त्यात फारसे तथ्य नसल्याचे दिसते. कारण शरद पवार यांची एक शैली राहिलेली आहे, जे सरकार अस्तित्वात येते ते फार काळ चालणार नाही, असे ते नेहमीच म्हणतात. यापूर्वीही पाच वर्ष पूर्ण करणाऱ्या फडणवीस सरकारच्या बाबतीतही त्यांनी अशी वक्तव्य बऱ्याच वेळा केली होती. परंतु फडणवीस सरकारने प्रशासनाला सोबत घेऊन आपले कामकाज आणि कार्यकाळ पूर्ण केला. सत्ता केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना चालवता येते, असा जो भ्रम महाराष्ट्रात निर्माण केला गेला होता, त्यात सेना आणि भाजप या पक्षांनीही आपली सरकारे चालवून दाखवून तो भ्रम यापूर्वीच्या प्रस्थापित नेत्यांच्या मनोभूमिकेतून दूर केला, असे व्यवहारातून सिद्ध झाले आहे. येणाऱ्या काळात आव्हाने जरूर असतील, परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लढाऊबाणा आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासकीय चाणाक्षपणा याच्या आधारे हे सरकार आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल, हा विश्वास वाटतो!

COMMENTS