Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्थानिकांच्या सहभागातून रयतचा विकास वाढवा ः चंद्रकांत दळवी

श्रीगोंदा/प्रतिनिधीः रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकाने उत्तम ज्ञानदान केले पाहिजे. गावातील

अहमदनगरमध्ये 2 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
मनातील मांडे…मनातच राहिले…आठजणांसमोर आता राजकीय अस्तित्वाचे आव्हान
कोतूळ संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती पोखरकर

श्रीगोंदा/प्रतिनिधीः रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकाने उत्तम ज्ञानदान केले पाहिजे. गावातील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेवून स्थानिक लोकांशी संवाद साधून शाळा व महाविद्यालयाचा विकासासाठी सहभाग वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील पाहिजे. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे व्यक्त केले.

तालुका रयत सेवक शैक्षणिक चर्चासत्रात ते मार्गदर्शन कर्ईं होते. आपल्या भाषणात पुढे दळवी म्हणाले की, कर्मवीरांच्या त्यागातून ही संस्था निर्माण झाली आहे. रंजल्या गांजलेल्यासाठी काम करणारी ही संस्था आहे. आज साडेचार लाख विद्यार्थी या संस्थेत शिकत आहेत. एवढी मोठी संख्या असलेली संस्था चालवताना घाम फुटतो.म्हणून निर्माणकर्त्या कर्मवीरांचे कौतुक केलेच पाहिजे. माजी विद्यार्थ्यांची संघटना मजबूत व्हायला हवी. प्रत्येक शाखेने माहिती पुस्तिका तयार केलीच पाहिजे. आपण सर्व समूहाने उत्तम काम करूया.आजही रयतचा विद्यार्थी म्हणून समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील विविध शैक्षणिक संकुलांना त्यांनी भेटी दिल्या. शाखांच्या आणि सेवकांच्या समस्या, सेवाज्येष्ठता, डीएड टू बीएड प्रमोशन,पदवीधर वेतनश्रेणी,पिटिशनर आणि नॉन पिटीशनर सेवक संदर्भात वैयक्तिकरित्या चर्चाही केली. या चर्चासत्रात रयत सेवकांच्या अनेक प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते म्हणाले की, रयत ही गतिशील संस्था आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार रयतेने केला आहे. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढत आहे. येत्या काही काळामध्ये संस्थेत सकारात्मक बदल होतील. चंद्रकांत दळवी साहेबांमुळे रयतेचे चित्र बदललेले असेल असा आशावादी विचार त्यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आ. राहुल जगताप म्हणाले की, रयत सेवकांच्या बदल्या सोयीच्या केल्या, तर शाखेचा विकास होईल. अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की, रयतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता अजून वाढली पाहिजे.रयत शिक्षण संस्थेचा सेवाभावी दृष्टीचा फायदा समाजाला होत आहे. प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.महादेव जरे यांनी केले. या चर्चासत्रात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अण्णासाहेब शेलार, कुंडलिक दरेकर बाजीराव कोरडे,उत्तरविभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, सर्व शाखाप्रमुख,स्कूल कमिटी सदस्य, महाविद्यालय विकास समिती सदस्य, रयत हितचिंतक, शिक्षणप्रेमी नागरिक आदी मान्यवर या चर्चासत्रासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शहाजी मखरे यांनीं केले. आभार प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी मानले.

रयतचे आगामी उपक्रम -रयतमध्ये झिरो पेंडन्सी आणणार, नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार, सीबीएसई, नीट, जेईई, पोलिस भरती केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र यांची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच समाजातील सर्व स्तरातील घटकांचा सहभाग वाढविणार.

COMMENTS