Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढवणवस्ती, तपोवन रोड येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

शाखेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील - संभाजी कदम

अहमदनगर प्रतिनिधी -  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजच्या तरुणपिढीलाही भावत आहेत. त्यामुळे आजही अनेक लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहे

स्थायी समितीने वाढवले 24 कोटीने बजेट ; आजपासून मनपा महासभेत होणार चर्चा
वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी
आदित्य चोपडा याचा घातपात… चौकशी करण्याची आमदारांची मागणी

अहमदनगर प्रतिनिधी –  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजच्या तरुणपिढीलाही भावत आहेत. त्यामुळे आजही अनेक लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. समाजातील सर्वक्षेत्रातील लोकांचा विकास व्हावा, त्याचे प्रश्न सुटावेत, यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनीे नेहमीच पुढाकार घेतला आहे. नगरमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असून, त्या विविध शाखांच्या माध्यमातून पक्षाची बांधणी सुरु आहे. तपोवन रोड उपनगराचा वाढता विकास होत असतांना त्या भागातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी  शिवसेनेचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहे. आज स्थापन झालेल्या शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्न सोडविले जातील. त्यासाठी प्रत्येक प्रभागनिहाय शाखा निर्माण करण्याचा मानस, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम(Sambhaji Kadam) यांनी व्यक्त केला.

     ढवणवस्ती, तपोवन रोड येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन शहरप्रमुख शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या हस्ते झाले.  युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, संदिप दातरंगे, अशोक दहिफळे, नगरसेवक योगिराज गाडे, युवा सेने शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर ,संजय आव्हाड, प्रशांत पाटील, अभिजित अष्टेकर, रमेश खेडकर, उपशहरप्रमुख प्रताप गडाख, शाखाप्रमुख यश सायंबर, विभागप्रमुख ऋषीकेश तळेकर, शाखाप्रमुख सुशांत कोकाटे, विशाल टेमकर, वैभव तिडके, ओंकार साबळे, अनिकेत राऊत, कुणाल रुणाल, अनुराग ससे,अरुण झेंडे ,मुना भिंगारदिवे  आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, युवकांना दिशा देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्व व पाठबळामुळे पक्षाची ताकद वाढत आहे. नगरमध्ये युवकांचे चांगल्याप्रकारे संघटन करुन पक्षाचे कार्य सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी शाखाप्रमुख यश सायंबर यांनी या परिसरातील युवक संघटनेची माहिती देऊन येथील नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शाखेचे पदाधिकारी काम करतील. पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने काम करु, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंलचान ऋषीकेश तळेकर यांनी केले तर आभार प्रताप गडाख यांनी मानले.

COMMENTS