नाशिक - शनिवार रोजी १० फेब्रुवारी रोजी राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते विविध विकास कामांचे भूमीपुजन सोहळे नाशिक मध्ये पार पड

नाशिक – शनिवार रोजी १० फेब्रुवारी रोजी राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते विविध विकास कामांचे भूमीपुजन सोहळे नाशिक मध्ये पार पडले यात कुंभार समाज बांधव यांना अपेक्षित भव्य दिव्य असे संत श्रेष्ठ शिरोमणी गोरोबाकाका यांचे नाशिक पुण्यभूमीत गोदावरी च्या तिरी मंदिर व सभा मंडपाचे भूमिपूजन शनिवार १०.०२.२०२४ रोजी सायंकाळी मेळा स्टँड नाशिक येथे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते नामदार गिरीश महाजन पर्यटन व ग्रामविकास मंत्री,अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.श्री छगनराव भुजबळ साहेब, नाशिक जिल्हाचे पालकमंत्री ना.श्री दादाजी भुसे साहेब , आमदार श्री राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत आमदार सौ। फरांदे यांच्या प्रयत्नातून संत श्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार यांच्या भव्य मंडप व मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी कुंभार समाजाच्या व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणी संदर्भात मागण्यांचे निवेदन देण्यात आले कुंभार समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येऊन संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या प्रसंगी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS