Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिरात मुर्ती समोरील दानपेटीमुळे भाविकांना दर्शन घेताना होतोयं अडथळा

पिण्यासाठी पाणी व लघुशंकेसाठी मुतारी उपलब्ध नसल्यामुळे महिलांची गैरसोय

गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवी देवस्थान महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले असून सध्या अ

तेजस्विनी लोणारीला निरोप देताना ढसाढसा रडले सदस्य
कांदा विक्रीचे तब्बल दीड कोटी बुडवले…गुन्हा दाखल
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक होणार? शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवी देवस्थान महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले असून सध्या अधिकमास सुरू असल्याने तलवाडा मार्गे पुरूषोत्तमपुरीला दर्शनासाठी जाणारे हजारो भाविक दररोज नवसाला पावणार्‍या श्रीक्षेत्र त्वरितादेवीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. परंतु याठिकाणी मंदिरात देवीच्या मुर्तीसमोर जी दानपेटी ठेवलेली त्या दानपेटीमुळे भाविकांना दर्शन घेताना अडथळा निर्माण होत असून मंदिर परिसरात लघुशंकेसाठी मुतारी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांची मात्र गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी दररोज येणार्‍या हजारो भाविकांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागतो. परंतु याकडे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी दुर्लक्ष करत असल्याने भाविक-भक्तांची मात्र हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवी देवस्थान महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रध्देचे व अस्मितेचे प्रतीक आहे. नवसाला त्वरित पावणारी देवी म्हणून श्रीक्षेत्र त्वरितादेवी देवस्थान महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात प्रसिद्ध आहे. याठिकाणी चैत्र महिन्यात एक महिना व नवरात्र उत्सवात पंधरा दिवस मोठी यात्रा भरते. लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. सध्या धोंडयाचा महिना म्हणजे तीन वर्षाला एकदा येणारा अधिकमास सुरू आहे. या महिन्यात महाराष्ट्रातून नव्हे इतर राज्यातून माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथील पुरूषोत्तम या देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या लक्षणीय असते. तलवाडा मार्गे पुरूषोत्तमपुरीला दर्शनासाठी दररोज शेकडो गाडया जात असून हे भाविक दररोज हजारोंच्या संख्येने तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवीचे देखील दर्शन घेत आहेत. परंतु याठिकाणी भाविकांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे महिलांना लघुशंकेसाठी मुतारी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. तसेच मंदिरात असलेली मुर्ती समोरील दानपेटी भाविकांना दर्शन घेताना अडथळा निर्माण करत आहे. हि बाब सगळ्यांच्या लक्षात येते परंतु विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांच्या लक्षात का येत नाही असा प्रश्न भाविक – भक्तांसह अनेकांनी उपस्थित केला आहे. ज्याठिकाणी भाविकांना दर्शन घ्यावे लागते त्याठिकाणी हि दानपेटी न ठेवता ती दानपेटी मंदिरातच परंतु एका बाजूला सरकवून ठेवावी अशी रास्त मागणी भाविकांकडून होत आहे. या मंदिराचे पुजारी व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांच्यातील हेव्यादाव्यामुळे हि दानपेटी मुर्तीच्या समोरच ठेवण्यात आलेली असून याचा त्रास मात्र भाविकांना सहन करावा लागत आहे. याकडे पोलिस प्रशासन, मा.धर्मदाय आयुक्त बीड अथवा तहसीलदार गेवराई यांनी जातीने लक्ष घालून भाविकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी रास्त मागणी भाविकांकडून होऊ लागली आहे.

COMMENTS