सांगली फेस्टिव्हल मध्ये फडकली भारतातील सर्वात मोठी पँट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली फेस्टिव्हल मध्ये फडकली भारतातील सर्वात मोठी पँट

पँटची उंची तब्बल २६ फुट तर कंबर १५ फुट

सांगली प्रतिनिधी - सांगली फेस्टिव्हल मध्ये  भारतातील सर्वात मोठी पँट  फडकली आहे.. या पँटची उंची तब्बल २६ फुट तर कंबर १५ फुट इतकी आहे. ही पँट जागतिक ट

राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर

सांगली प्रतिनिधी – सांगली फेस्टिव्हल मध्ये  भारतातील सर्वात मोठी पँट  फडकली आहे.. या पँटची उंची तब्बल २६ फुट तर कंबर १५ फुट इतकी आहे. ही पँट जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी २०२२ रोजी तयार करण्यात आली होती. मिरज मधील स्टाईलअप टेलरचे इम्रान मलिदवाले आणि त्यांच्या टीमने ही भली मोठी पॅन्ट डिझाइन केली आहे. सांगली भरलेल्या  फेस्टिव्हल मध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली  होती. ह्या पॅन्टला  ५० मिटर इतके कापड लागले असून  पँटची उंची तब्बल २६ फुट (३१२ इंच) इतकी तर कंबर १५ फुट (१८० इंच), मांडी १० फुट (१२० इंच), पँटचे बॉटम ३ फुट (३६ इंच) इतके  ठेवण्यात आले आहे. ह्या पँटला बनवण्यासाठी तब्बल ८ दिवस २ तास इतका वेळ लागला होता…पॅन्टची खास वैशिष्ठ्ये म्हणजे बटन सागवान लाकडा पासून नक्षीदार कारीगरी तयार करुन घेण्यात आले आहे व खास बेल्ट च्या कंपनीकडून पँटचे बेल्ट बनवून घेतले आहे. पॅन्टला आतुन लागणारी ग्रीप सुध्दा स्पेशल एम्ब्रॉयडरी तयार करुन घेण्यात आली आहे. ह्याची चेन सुध्दा स्पेशल बनवून घेतली आहे. ओव्हर लॉक मॅचिंग दोऱ्याने मारण्यात आले आहे. 

COMMENTS