Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये क्रूर पित्याने पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं

पत्नीसोबत वाद झाल्यानंतर कृत्य

अहमदनगर प्रतिनिधी - पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना अहमदनगर जिल्ह्यात घडली

प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
संजीवणी युवा प्रतिष्ठाणच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान
वीजपंप चोरणारे आरोपी अटकेत

अहमदनगर प्रतिनिधी – पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना अहमदनगर जिल्ह्यात घडली. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38 वर्षे, रा. आळसुंदे, कर्जत) असं क्रूर पित्याचं नाव आहे. तर ऋतुजा (वय 8 वर्षे) आणि वेदांत (वय 4 वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावं आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (6 ऑगस्ट) ही घटना घडली. गोकुळ क्षीरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर त्याने रागाच्या भरात आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले. या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS