Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदेशीर वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण अटकेत

पुणे : पुण्यातून पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुहम्मद अमान अन्सारी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या

आगामी आर्थिक वर्ष भारतासाठी खडतर
वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून
लातुरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणार्‍या 7 पेट्रोलपंप, 31 हॉटेल्सवर होणार कारवाई- जिल्हाधिकारी

पुणे : पुण्यातून पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुहम्मद अमान अन्सारी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही तो वास्तव्य करत असल्याचे आढळून आल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे. मुहम्मदने खोटी कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट काढला आहे. त्याचा वापर करून त्याने पुणे ते दुबई असा प्रवास केला. यानंतर त्याला पासपोर्ट कायदा कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,  पुणे पोलिसांच्या पाकिस्तानी नागरिक पडताळणी विभागाचे विशेष शाखेने याबाबत तपास केला असता, सदर तरुणाने बनावट कागदपत्राआधारे पासपोर्ट बनविण्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. मुहम्मद अमान अन्सारी (वय-22,सध्या रा.भवानी पेठ,पुणे, मु.रा.पाकिस्तान) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विशेष शाखेचे पोलिस शिपाई केदार प्रदीप जाधव (वय-31) यांनी खडक पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुहम्मद अन्सारी याची आई भारतीय असून वडील पाकिस्तानी आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे कुटुंबीय वास्तव्यास असतानाही तो सन 2015 पासून आतापर्यंत भवानी पेठ येथे त्याच्या आज्जीकडे बेकायदेशीरपणे कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय अवैधरित्या वास्त्वय करताना मिळून आलेला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिक मुहम्मद अन्सारी असताना ही त्याने खोटी कागदपत्रे वापरुन भारतीय पासपोर्ट बनविला आहे. त्याचा वापर करुन त्याने पुणे ते दुबई असा प्रवास देखील केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम 420, 468, 471, विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 आणि पासपोर्ट कायदा 1967 चे कलम 12 (1अ), (ए) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पुढील तपास खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस तटकरे करत आहे. खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले की, आरोपी मोहम्मद अन्सारी हा बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करताना मिळून आलेला आहे. याबाबत विशेष शाखेने त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे तो पाकिस्तानचा रहिवासी असतानाही भारतीय पासपोर्ट बनवून पुणे ते दुबई दरम्यान प्रवास केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात हेरागिरीचा प्रकार अद्याप उघडकीस आलेला नसून बोगस कागदपत्रे बनवणे आणि बेकायदेशीर वास्तव्य करणे हा अपराध आरोपीने केल्याचे दिसून आले आहे.

COMMENTS