Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हेर येथील सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गेवराई प्रतिनिधी ः- कोल्हेर येथील सरपंच राधेशाम चक्कर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्र

बेसुमार पाणी वापरणाऱ्यांनी किमान दहा पट तरी पाणी पट्टी भरावी : वाहडणे
13 वर्षीय मुलीचा विवाह लावणारे गोत्यात (Video)
भविष्यात पुन्हा युती होईल का याचे काळच उत्तर देईल : रविंद्र बोरावके यांचे सूतोवाच

गेवराई प्रतिनिधी ः- कोल्हेर येथील सरपंच राधेशाम चक्कर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 52 लक्ष रुपये किंमतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाला कोल्हेर ग्रामस्थांसह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हेर येथे जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 52 लक्ष रुपये किंमतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते गुरुवार, दि.13 एप्रिल रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात कोल्हेर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आजच्या प्रवेश सोहळ्यामध्ये कोल्हेर राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र दिसले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, पंचवटी संस्थानचे ह.भ.प.अशोक महाराज, नगरसेवक शाम येवले, मनोहर पिसाळ, सुभाष महाराज नागरे, शहराध्यक्ष दिपक आतकरे, सरपंच प्रतापसिंह पंडित, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष कैलास माने, लुखामसला येथील सरपंच रावसाहेब काळे, किनगावचे सरपंच रामप्रसाद चाळक, घोसापूरीचे सरपंच फारुक पटेल, वाहेगावचे सरपंच समीर पटेल, अर्धमसल्याचे सरपंच अंगद मैंद, चेअरमन कैलास यादव, गजानन काळे, माजी सरपंच विजय येवले, अक्षय पवार, सोमनाथ गिरगे, युवराज नागरे, जयसिंग माने, माजी सरपंच साळीकराम चक्कर, शिवाजी चक्कर, रावसाहेब येवले, महारुद्र चाळक, शाम चाळक, श्रीहरी पवार, बद्रीनाथ जाधव, अशोक येवले, तुकाराम यादव, सुधाकर पवार, लक्ष्मण पवार, अशोक पंडित, गोविंद बरगे, अमित वैद्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रवेश सोहळ्यात कोल्हेर येथील सरपंच राधेशाम चक्कर, उपसरपंच रवि येवले, ग्रामपंचायत सदस्य दिलीप यादव, सुभाष यादव, तुळशीदास कातखडे, सुरेश मुळे, शरद चक्कर, धम्मदिप काळे, पंकज सुतार यांच्यासह शुभम येवले, अभिषेक येवले, अप्पासाहेब पवार, गणेश काशिद, तुकाराम यादव, भागवत यादव, संजय सुतार, दादा नराडे, अमोल यादव, विलास चक्कर, रमेश चक्कर, राम येवले, सतिष येवले, राजेंद्र शेंडगे, शिवाजी पवार, सचिन पवार, लक्ष्मण पवार, ज्ञानेश्वर माळवदकर, नामदेव माळवदकर, पप्पू चक्कर, शेषेराव गायकवाड, सचिन गायकवाड, सुनिल मगरे,  अनिल मगरे, संतोष मगरे, बाबुराव शिंदे, हिरामन गुजर, शिवाजी गुजर, गंगाधर पवार, राजेंद्र पवार, मधुकर पवार, गणेश पवार, संजय चक्कर, रमेश चक्कर, जगदीश चक्कर, मनोज चक्कर, एकनाथ माळवदकर, संतोष चक्कर, गोकुळ काशिद, राम गव्हाणे, अशोक येवले, शिवाजी चक्कर, रावसाहेब येवले, सुधाकर पवार आदी शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुभाष नागरे, गजानन काळे, कैलास माने आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.अजय येवले यांनी केले, सुत्रसंचलन गणेश काशिद यांनी केले तर आभार सरपंच राधेशाम चक्कर यांनी मानले.

COMMENTS